Tuesday, March 11, 2025

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत चिपळूण शहरात महास्वच्छता अभियान

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून चिपळूण शहर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात

येतात.या प्रतिष्ठानच्या सौजन्याने रविवार दिनांक २ मार्च  रोजी सकाळी ८.३० वाजता चिपळूण शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले ‘स्वच्छता दूत’ डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.या शहर स्वच्छता अभियानामध्ये चिपळूण शहरासोबत महाराष्ट्रातील तसेच देशात व परदेशात देखील विविध शहरांमध्ये हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या शहर स्वच्छता अभियानामध्ये सावर्डे, पाचाड, धामनंद वावे, अलोरे, लवेळ, सती येथील श्री बैठक मधील हजारोच्या संख्येने सर्व श्री सदस्य सहभागी होणार आहेत. तरी या स्वच्छता अभियानामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने आपणा सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपणही या शहर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे.या स्वच्छता अभियानामध्ये शहरातील सर्व प्रमुख रस्ते व शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे तसेच या अभियानामध्ये सर्व शासकीय कर्मचारी यांनी देखील सहभागी व्हावे असे प्रतिष्ठानच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.

Hot this week

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...

क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी कौतुकास्पद : खा.सुनील तटकरे

चिपळूण (ओंकार रेळेकर)क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी...

महाराष्ट्रात सहकारातून समृद्धी घडविण्याचे काम पतसंस्थांनी केले : अनिल कवडे

◾कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिपळूण नागरी पतसंस्था कोकण...

चिपळूण नागरीची ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५’ पुरस्कारासाठी निवड

अलिबाग येथे दि. १५ व १६ रोजी पुरस्कार होणार...

Topics

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...

क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी कौतुकास्पद : खा.सुनील तटकरे

चिपळूण (ओंकार रेळेकर)क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी...

महाराष्ट्रात सहकारातून समृद्धी घडविण्याचे काम पतसंस्थांनी केले : अनिल कवडे

◾कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिपळूण नागरी पतसंस्था कोकण...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य

चिपळूण उबाठा शिवसेना आक्रमक  चिपळूण (ओंकार रेळेकर)छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक...

फन एन फेअरच्या माध्यमातून रोट्रॅक्टने विक्रेत्यांना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले : प्रशांत यादव

चिपळूण (ओंकार रेळेकर)रोट्रॅक्ट फन एन फेअर मधून असंख्य विक्रेत्यांना...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img