चिपळूण : माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती श्री.बाळशेठ जाधव यांचे सुपुत्र व प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर श्री. स्वप्निल बाळशेठ जाधव यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या रत्नागिरी उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुहृदसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तथा डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या रत्नागिरी उपजिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात येत असल्याचे पत्र स्वप्निल जाधव यांना देण्यात आले आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०%) राखीव खाटा उपलब्ध करुन देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे. गंभीर-महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री. सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक, अध्यक्ष मंगेश चिवटे, कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी केले आहे. स्वप्निल जाधव यांच्या निवडीबद्दल तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
