Thursday, June 26, 2025

सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान तर्फे शुक्रवारी शेतकऱ्यांना मोफत खत वाटप

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.डॉ.उदय सामंत आ.किरण सामंत,आ. शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती

चिपळूण (ओंकार रेळेकर)संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने शुक्रवार दि.२७ जून रोजी सकाळी ११ वाजता कडवई बाजारपेठेतील सिद्धेश ब्रीद जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा शिवसेना नेते ना.डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते येथील शेतकऱ्यांना मोफत खत वाटप केले जाणार आहे अशी माहिती सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठानचे प्रमुख शिवसेना युवा नेते सिद्धेश ब्रीद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे युवा नेतृत्व मंत्री डॉ.उदय सामंत यांचे निकटवर्तीय सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्या विशेष सहकार्याने सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे शुक्रवारी सकाळी कडवई येथील शेतकरी बंधूंना मोफत खताचे वाटप केले जाणार आहे.शिवसेना नेते महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते होणाऱ्या मोफत खत वाटप कार्यक्रमाला राजापूर -लांजा-साखरपा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किरण सामंत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम माजी आमदार डॉ. सुभाष बने, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने,माजी आ.सदानंद चव्हाण,शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजू महाडिक,रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, जिल्हा बँक संचालक राजेंद्र सुर्वे,रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित,संगमेश्वरचे माजी सभापती दिलीप सावंत,भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,कडवई गावचे सरपंच प्रशांत ब्रीद यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत युवा नेते सिद्धेश ब्रीद हे आपल्या सामाजिक कार्यातून नेहमीच चर्चेत राहिले आहेत कोरोना संक्रमण काळ असो महापुराचे संकट या काळात त्यांनी आपल्या प्रतिष्ठान तर्फे मौलाचे मदत कार्य केले आहे याशिवाय गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके गणवेश वाटप गरजवंतांना वैद्यकीय मदत तसेच शैक्षणिक कार्यात देखील त्यांची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे.

Hot this week

डॉ. यतीन जाधव ‘लोटिस्मा’ अध्यक्षपदी; कार्याध्यक्षपदी अरुण इंगवले यांची निवड

१६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची नवीन कार्यकारिणी...

रेयांश पराग बने याची बाल वयातच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी

९ वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कु. रेयांशने...

🛑आमदार किरण सामंत यांची वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट

◾प्रशांत यादव आणि सौ. स्वप्ना यादव यांच्याकडून स्वागत चिपळूण (ओंकार...

प्रथमेश जीवन रेळेकर याचे एल. एल.बी परीक्षेत सुयश

चिपळूण (ओंकार रेळेकर) येथील पेठमाप प्रभागातीलप्रथितयश अँड.श्री. जीवन काशिनाथ...

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज- सुभाषराव चव्हाण

चिपळूण नागरी व वाशिष्ठी डेअरी, जिल्हा निबंधक सहकारी संस्थेतर्फे...

Topics

महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

चिपळूण :  महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे...

चिपळूण नागरीने सलग ३२ वर्ष सभासदांचा विश्वास टिकवून ठेवला

संकल्प-संकल्पपूर्ती सोहळा करणारी एकमेव पतसंस्था … तर सहकारात आणखी चांगले...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img