स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार नेतृत्व

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुभाष बने यांचा नातू रेयांश पराग बने यांने कोकणच्या इतिहासात नवा विक्रम रचला आहे. केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत रेयांश बने महाराष्ट्र राज्याच्या वतीने स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी मंगळवारी सकाळी मुंबई येथून विमानाने केरळ येथे दाखल झाला आहे. या स्पर्धेसाठी त्यांने मागील काही दिवस उत्तम सराव आणि व्यायाम देखील केला आहे केरळ येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता भारत देशातून विविध राज्यांमधून बालखेळाडू केरळमध्ये दाखल झाले आहेत.बाल वयातच स्केटिंग स्पर्धेमध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या नऊ वर्षीय रेयांशने आजपर्यंत २८ सुवर्णपदके मिळवत विविध ठिकाणी झालेल्या स्केटिंग स्पर्धेत उज्वल यश संपादन केले आहे त्याच्या या यशाबद्दल विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग मानांकन स्पर्धा २०२५ कोचीन – केरळ येथे गुरुवार दिनांक १५ ते १९ मे दरम्यान होणार आहे या स्पर्धेत कु. रेयांश बने केरळ मध्ये दाखल झाला आहे त्याच्या सोबत त्याचे आजोबा माजी आ.डॉ.सुभाष बने,वडील पराग बने आणि आई,आजी कुटुंबीय दाखल झाले आहेत.रेयांश हा या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून रेयांश बने याची निवड झाली आहे
रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा एर्नाकुलंम कोंची केरळ येथे होणार आहे. यात ६ ते८. ८ ते १०. १० ते १२ १२ ते १५ १५ ते १८ अशा पाच वयोगटातील मुले,मुली व पुरुष व महिला खुला गट असे विविध गट सहभागी होणार असून यातून अखिल भारतीय मानांकन ठरणार आहे.या अखिल भारतीय जलद स्केटिंग मानांकन स्पर्धेत रेयांश पृथा पराग बने याची निवड झाली आहे.रेयांश हा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे.महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू रेयांश बने हा युरो स्कूल, ऐरोली, ठाणे या शाळेचा विद्यार्थी असून वयाच्या पाचव्या वर्षी त्याने महाराष्ट्रातील बेळगाव येथे सतत ९६ तास स्केटिंग करून आपले नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.त्याने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये २८ सुवर्ण १० रौप्य आणि ८ कांस्य पदके पटकावली आहेत. कू. रेयांश पृथा पराग बने हा शिवसेना भांडूपचे युवानेते पराग बने, यांचा चिरंजीव आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व थरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून गुरुवारपासून सुरू होणाऱ्या मानांकन स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत .