चिपळूण (ओंकार रेळेकर)अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी कौतुकास्पद आहे असे सांगून पिरधामापूर सारख्या खेडेगावातून नोकरी व्यवसाय निमित्त डोंबिवली सारख्या मोठ्या शहरात गेलेला एक तरुण बघता बघता डोंबिवली एमआयडीसी मध्ये स्वतःचा रंग निर्मितीचा व्यवसाय सुरू करतो आणि नावारूपास
देखील आणतो ही अविनाश कांबळे यांची व्यवसायातील घोडदोड खरोखरच अभिमानास्पद आहे अशा शब्दात शिवसेना नेते आ.भास्कर जाधव यांनी ऑटो कार कलर अँड कोटिंग कंपनीच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना अविनाश कांबळे यांना शुभेच्छा दिल्या.
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर पीर अशा खेडेगावात अविनाश कांबळे यांनी जन्म घेऊन शून्यातून आपल्या अथक परिश्रमाने डोंबिवली सारख्या मोठ्या शहरात रंगाचा उत्तम उद्योग व्यवसाय सुरू करून अनेक तरुणांच्या हाताला रोजगाराची संधी मिळून दिली त्यांच्या कुटुंबाला त्यांनी भक्कम आधार दिला अविनाश कांबळे हे असाच रंगकाम उद्योग युनिट लोटे एमआयडीसी परिसरात करीत आहेत त्यांच्या या व्यवसायाची भरभराट होऊ दे अशा शब्दात महाराष्ट्राचे शिवसेना नेते स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी बोलताना शुभेच्छा दिल्या .ऑटो कार कलर अँड कोटिंग कंपनीचां बांधकाम भूमिपूजन सोहळा चिपळूण तालुक्यातील लोटे परिसर या ठिकाणी काल संपन्न झाला यावेळी भूमिपूजन सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना आमदार भास्कर जाधव बोलत होते. अविनाश कांबळे यांनी डोंबिवली सारख्या शहराकडून परशुराम सारख्या गावामध्ये उद्योग सुरू करत असल्याबाबत त्यांनी त्यांचे कौतुक केले .या कार्यक्रमात चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी भूमिपूजनास उपस्थित राहून अविनाश कांबळे आणि परिवारांना शुभेच्छा दिल्या. या उद्योगातून कोकणातील तरुणांना रोजगारची संधी उपलब्ध होईल अशा प्रकारचा आशावाद आमदार निकम यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केला.या उद्योग व्यवसायाच्या पाठीशी आपण सदैव राहो अशी ग्वाही देखील आमदार शेखर निकम यांनी दिली. आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून एका युनिटचे तर आ. शेखर निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दुसऱ्या युनिटचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अविनाश कांबळे आणि परिवार यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. आमदार भास्कर जाधव आमदार शेखर निकम राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जयद्रथ खताते, अँड.अमोल भोजने राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, जिल्हा परिषद सदस्य सुनील मोरे, माजी नगरसेवक समिर जाधव,माजी जि.प सदस्य अजय बिरटकर, लोटे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲड.राज आंब्रे, प्रशांत पटवर्धन,बबन बांडागळे,अवनी कांबळे, शिवानी कांबळे,मुकुंद वाजे,
मोहन मिरगल, रमाकांत कांबळे, अजय भालेकर,
अपर्णा कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
फोटो : लोटे एमआयडीसी येथे सुरू होत असलेल्या ऑटो कार कलर अँड कोटींग उद्योगाचे भूमिपूजन करताना आ.भास्कर जाधव ,मोहन मिरगल,अजय बिरवटकर,अविनाश कांबळे आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया: ओंकार रेळेकर)
फोटो 2 : आमदार भास्कर जाधव यांचा सत्कार करताना अविनाश कांबळे आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)