Thursday, April 17, 2025

आंबा घाटात ट्रक पलटी; तीन तास झाली होती वाहतूक ठप्प

विशाळगड : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा (ता. शाहूवाडी) घाट उतरताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. काल रविवारी (दि.३) सकाळी आठ वाजताच्या सुमारास आंबा खिंडीजवळ अपघात झाला.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे व ट्रक मधील मालाचे आर्थिक नुकसान झाले. या अपघातामुळे तीन तास वाहतूक ठप्प होती. साखर व इतर माल घेऊन रत्नागिरीकडे जाताना घाटात ही घटना घडली.

चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था

याबाबत अधिक माहिती अशी, देवाळे (ता.पन्हाळा) येथील सुतार यांचा ट्रक  रत्नागिरी येथील डी.मार्टचा माल घेऊन आंबा घाटातून निघाला होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. ट्रक पलटी होताच चालक तेथून पसार झाला. घाटात कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्यावर खडी विखुरल्याने वाहन चालकास मोठी कसरत करावी लागते. ट्रक मध्येच‌ पलटी झाल्याने तीन तास वाहतूक खंडीत झाली.

घाट परीसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साखरपा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार नितीन जाधव आणि प्रदीप कामटे यांनी वाहतूकीचे नियंत्रण केले. साडे दहा वाजता क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून एकेरी वाहतूक चालू करण्यात आली.

Hot this week

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे २ विदयार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत

चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

Topics

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img