Thursday, April 17, 2025

आभार आणि गाठीभेटीसाठी विधिमंडळ शिवसेना गटनेते आ.भास्कर जाधव २९ नोव्हेंबर पासून मतदार संघात

चिपळूण:-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते तथा विधिमंडळातील शिवसेना गटनेते आ.भास्करराव जाधव गुहागर विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे आभार व्यक्त करण्याकरीता व गाठीभेटी घेण्यासाठी शुक्रवारपासून मतदार संघात दाखल होत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा
विजयी झाल्या बद्दल शिवसेना नेते आ.भास्करराव जाधव हे मतदारसंघातील जनतेचे आभार व गाठीभेटी घेण्यासाठी शुक्रवारपासून चिपळूण गुहागर विधानसभा मतदारसंघात उपस्थित राहणार आहेत. दि. २९ नोव्हेंबर पासून चिपळूण येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे शुक्रवारी स.११ ते दू.१ या वेळेत नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत.गुहागर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या खेड तालुक्यातील गावांमधील ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेण्यासाठी व आभार मानण्यासाठी उबाठा शिवसेना उपजिल्हा प्रमुख  सचिन उर्फ पप्पू आंब्रे यांच्या आवाशी ता.खेड येथील निवासस्थानी दु.३ ते साय.५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत.

तसेच शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी गुहागर तालुक्यातील नागरिकांचे आभार मानण्यासाठी व गाठीभट्टी घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह गुहागर येथे स. ११ ते दु. १ यावेळेत उपस्थित राहणार आहेत.शनिवारी सकाळी गुहागर शहरात आगमत होतातच आ.जाधव प्रथम गुहागर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्रामगृह गुहागर येथे जाणार आहेत.उबाठा शिवसेना,शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी,इंदिरा काँग्रेस आणि महाविकास आघाडी मधील कार्यकर्ते आ.जाधव यांच्या आभार आणि गाठीभेटी दौऱ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Hot this week

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे २ विदयार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत

चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

Topics

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img