Wednesday, January 22, 2025

इम्पेरिअल डेकोर या मॉडर्न, डेकोरेटिव्ह फर्निचरच्या भव्य दालनाचा शानदार शुभारंभ संपन्न

सलीम मेमन यांच्या हस्ते फीत कापून झाले उदघाटन

चिपळूण/ओंकार रेळेकर:- चिपळूण मधील तरुण उद्योजक निहाल मालाणी आणि सोहेल फजलानी  यांनी नव्या फर्निचर विक्री व्यवसायात पदार्पण केले असून इम्पेरिअल डेकोर या मॉडर्न,डेकोरेटिव्ह फर्निचरच्या भव्य दालनाचा शुभारंभ नासिम मालानी यांचे भाऊजी सलीम मेमन यांच्या हस्ते फीत कापून झाले.नमाज आणि प्रार्थना पठण करून उद्घाटनचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
चिपळूणमधील प्लॉट नंबर ए -१९, खेर्डी, एमआयडीसी, गुरुकुल कॉलेजच्या समोरील प्रशस्त जागेत हे भव्य आणि आकर्षक दालन सुरू करण्यात आले आहे.आपल्या सेवाभावी वृतीने प्रत्येक व्यवसायात यशस्वी झालेले आणि एक मोठे ब्रँड झालेले मालाणी- फजलानी कुटुंबाने ग्राहकांच्या सोयीसाठी फर्निचरचे
मॉडर्न आणि भव्य दालन सुरु केले आहे. या दालनामध्ये विविध
प्रकारचे मॉडर्न सोफे, डायनींग टेबल, बेडरूम सेट, ऑफिस टेबल,
ऑफिस चेअर, सेंटर टेबल, कॅफे चेअर, बेडरुम सेट, वॉलपेपर, रग्स्,
कार्पेट, आऊटडोअर फर्निचर, पडदे व बेडशिट्स, गादी (मॅट्रेस),
झोपाळा (झुला), सिलिंग सोल्युशन, कन्सोल युनिट, मॉड्युलर किचन,
टिव्ही युनिट, डेकोरेटिव्ह प्रॉडक्टस् आदी आधुनिक प्रकारचे आकर्षक
फर्निचर मिळणार आहे.
दिल्ली, मुंबई, पुणे सारख्या महानगरात पाहण्यात येत असलेले फर्निचर आता चिपळुणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे या भव्य दालनाकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. मालाणी- फजलानी कुटुंबियांनी नेहमीच ग्राहकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. ग्राहकांच्या आवडी निवडी जपताना मुंबई पुण्यामध्ये मिळणाऱ्या मॉडर्न फर्निचरची इथे वाढती मागणी लक्षात घेऊन ते या भव्य दालनाचे सुरू झाले आहे. आकर्षक आणि मॉडर्न फर्निचर, होम डेकोरच्या दालनाची चिपळूणमध्ये अत्यंत गरज असल्याने या भव्य दालनाला ग्राहक नक्कीच उदंड प्रतिसाद देतील असा विश्वास अनेक ग्राहकांनी बोलताना व्यक्त केला.राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव, विक्रांत जाधव,समीर जाधव,मा. आमदार सदाभाई चव्हाण, मुकता शेखर निकम, बाबाजी शेठ जाधव, मौलाना रियाज वाडकर, मौलाना युनूस घारे, मुजम्मिल मुकादम, नासिमशेठ मालाणी, युनूसभाई फजलानी, निहाल मालाणी, सोहेल फजलानी, शोएब मालाणी , नदीम मालाणी, निसार मालाणी, उद्योजक मुबीन खोत, ज्येष्ठ व्यापारी रामशेठ रेडीज , इम्रान नूर, जावेद बोट आदींसह कृषी तज्ञ डॉ.तानाजीराव चोरगे , चिपळूण बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष तडसरे यांच्यासह त्यांचे सर्व पदाधिकारी भाजपाच्या युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्राताई चव्हाण, जिल्हा सरचिटणीस परिमल भोसले, राष्ट्रवादीचे शरदपवार पक्षाचे मुराद अडरेकर, अब्दुल गणी दलवाई, उद्योजक केतन पवार, आर्किटेक्ट दिलीप देसाई, उद्योजक महेंद्र शर्मा,  गजानन कदम, खेड येथील बांधकाम व्यवसायिक सिकंदर मुसा, रियाज खेरटकर, यासीन दळवी, साजिद सरगुरोह आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मालाणी-फजलानी कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा.

फोटो : इम्पेरिअल डेकोर या मॉडर्न, डेकोरेटिव्ह फर्निचरच्या दलनाचा शुभारंभ करताना मौलाना रियाज वाडकर यांच्यासह नासिम मालाणी,
युनूसभाई फजलानी,निहाल मालाणी, सोहेल फजलानी आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Hot this week

चिपळूणमधील उद्योजक प्रकाश देशमुख मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी...

जगविख्यात इ एन टी सर्जन डॉ. मिनेश जुवेकर यांचे द्वारे अपरांत हॉस्पिटल येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन.

चिपळूण (पवन न्यूज)दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अपरांत हॉस्पिटल येथे...

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

Topics

चिपळूणमधील उद्योजक प्रकाश देशमुख मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी...

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

कोकणात वाळू विक्रीसाठीपरवानगी मिळावी : संदेश मोहिते

चिपळूण : कोकण विभागात वाळूसाठीकायदेशीर परवानगी द्यावी. तसेच निश्चित...

अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी कौतुकास्पद : आ.भास्कर जाधव 

चिपळूण (ओंकार रेळेकर)अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी...

चिपळुणात रांगोळी आणि केक स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : शिवसेनायुवसेनेच्यावतीने (ठाकरे) दि.२३ जानेवारी रोजी रांगोळीस्पर्धा आणि...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img