चिपळूण (पवन न्यूज)कोकरे नायशी, वडेर, कळबुशी मार्गे
गेली ४० वर्षे चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकातून
सायंकाळी सुटणारी चिपळूण-कासे बससेवा
महिनाभरापासून बंद होती. अखेर राजापूरचे
आमदार किरण सामंत यांच्या सहकार्यामुळे ही
बससेवा पूर्वक्त झाली असल्याची माहिती नायशी
उपसरपंच संदीप घाग यांनी दिली.
चिपळूण आगाराने ही फेरी बंद केल्यामुळे
परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत
होते. त्यामुळे फेरी सुरू न झाल्यास घाग यांच्यासह
पालक, विद्यार्थी २६ जानेवारीला चिपळूण
आगारात ठिय्या आंदोलन करणार होते. मात्र
बसफेरी सुरू होत नसल्याने या संदर्भात आमदार
सामंत यांच्याकडे निवेदन देण्यात आले. अखेर या
निवेदनाची दखल घेत सामंत यांनी महामंडळास
बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार सोमवारपासून बससेवा पूर्ववत झाल्याने
ने विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.