Tuesday, June 3, 2025

कोकणातील पारंपरिक जाखडी नृत्याला राजाश्रयाची गरज 

रत्नागिरी:- गणेशोत्सव म्हटले की समोर येतो तो शक्ति-तुरा कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं… कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला मिळतं… गणेशोत्सवात कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाखडीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात. मात्र हा प्रकार  सणासुदीचे काळात पाहवयास मिळत असून शासनाच्या सांस्कृतिक विभागाने या पारंपरिक नाचाला पारंपरिक पद्धतीला अनुदानाचा हातभार लावत ही कला जोपासण्यासाठी योजना आखणे गरजेचे बनले आहे. सध्या शक्ति-तुर्‍याचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे.

जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शक्ती-तुरा हा नाच प्रसिद्ध आहे. कोकणच्या जाखडी नृत्याला एक वैशिष्टपूर्ण असा ठेका आहे. जाखडीला साथ देणारे, गणगवळण गाणारे मध्यभागी एकत्र बसतात आणि वैशिष्टपूर्ण रंगीबेरंगी कपडे घालत जाखडी नृत्य करणारे त्यांच्या भोवती फेर धरून नाचतात. कोकणच्या ग्रामीण भागात जाखडी नृत्याची परंपरा जपणारी घराणी आहेत. त्यांचेही नियम आणि मान ठरलेले आहेत. कोकणात काही घराण्याने गाणी रचतात. हल्ली या गाण्यांना नव्या चित्रपटातील गाण्यांची चाल लावली जाते. काळाच्या ओघात कोकणचा हा सांस्कृतिक ठेवा मागे पडतोय. नवी पिढी या लोककलेपासून दूर जातेय. काही भागात ही लोककला जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतायत.

गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी आपण कोकणातील कोणत्याही गावात पोहोचलो तर जाखडीचा हा ठेका हमखास कानी पडतो. फेर धरून जाखडी नाचणार्‍या कलावंतांभोवती अख्खा गाव जमा होवून त्याचा आनंद घेत असतो. निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे जाखडी नृत्य. जाखडीमधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्याने केला जातो, म्हणून त्यास जाखडी असे म्हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो जखडणे. जाखडीमध्ये नृत्य करणार्‍यांची शृंखला तयार केली जाते. काही ठिकाणी विशेषतः मंडणगड, दापोली या तालुक्यात जाखडी नृत्यास बाल्या नाच असेही म्हटले जाते. तर चिपळूण, खेड, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी याठिकाणी शक्ति- तुरा असेही म्हटले जाते.

मुंबईत ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्या नृत्याला, बाल्या नाच असे नाव पडले. बाल्या अथवा जाखडी नृत्यास रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी चेऊली नृत्यम असेही म्हणतात.
तर रत्नागिरी जिल्ह्याच्या शक्ति-तुर्‍याला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळत आहे. त्या कला प्रकाराचा उगम शाहिरी काव्य, तमाशा या लोककलांपासून सुरू झाला. त्यात कलगीवाले व तुरेवाले असे दोन पंथ असतात. सहाव्या शतकानंतर होऊन गेलेले कवी नागेश यांनी कलगी या पंथाची सुरुवात केली. त्यांच्या नावावरुन त्या पंथाला नागेशवळी म्हणजेच नागेशाची ओळ किंवा पंथ असेही ओळखले जाऊ लागले. नागेश यांनी कलगी पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला समकालीन कवी हरदास यांनी तुरेवाले या पंथाची सुरुवात केली. त्याला हरदासवळी म्हणजेच हरदासाची ओळ किंवा पंथ असेही म्हटले जाऊ लागले. दोन पंथांपैकी एकाने शक्तीचा (पार्वतीचा) मोठेपणा आपल्या कवितेतून किंवा शाहिरीतून मांडला आणि दुसर्‍याने हराचा (शिवाचा) मोठेपणा सांगितला.

पुढे, पंथांना ओळखण्याची खूण म्हणून कलगीवाल्यांनी कलगी या चिन्हाचा वापर केला आणि तुरेवाल्यांनी आपल्या डफावर पंचरंगाचा तुरा लावण्याचा प्रघात पाडला. या दोन गटात काव्यात्मक जुगलबंदी रंगते. त्या प्रकारच्या शाहिरीतून तमाशा हा लोककला प्रकार निर्माण झाला. त्याची कोकणातील आवृत्ती म्हणजे बाल्या. बाल्या, शक्ति-तुरा नृत्य श्रावणमास ते दिवाळी या काळात विशेष सादर केले जाते. नाचासाठी ढोलकी, मृदुंग, घुंगरू, झांज, टाळ, बासरी, सनई या वाद्यांचा वापर केला जातो. बदलत्या काळानुसार बाल्यांचे कपडे, म्हटली जाणारी गाणी यात बदल होत गेले. यंदाच्या गणेशोत्सवात जाखडी नृत्याचा प्रभावात वाढ झाली असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

Hot this week

माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस १ जून रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार

चिपळूण (ओंकार रेळेकर)माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस...

प्रकाश इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश देशमुख यांचा श्रीलंका देशात कोलंबो येथे वीज ट्रान्समिशन लाईन आणि सबस्टेशनचा करार

कोकणातील उद्योजकाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगात गरुड भरारी चिपळूण (ओंकार रेळेकर)...

अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा …….म्हणजे बने साहेब : श्रीकृष्ण खातू माजी आमदार डॉ. श्री.सुभाष बने वाढदिवस विशेष

===================शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला...

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

Topics

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

बांदल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी...

अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश बने केरळ मध्ये दाखल

स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार नेतृत्व चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण संगमेश्वर...

वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचा चिपळूण बाजारपेठेत शुभारंभ

प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती चिपळूण :...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img