
चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मध्ये झालेल्या पुणे विभागीय मंडळातून कुमारी ताहुरा इम्तियाज चौगले हिने सिंहगड इन्स्टीट्यूट कोंढवा पुणे मधून वाणिज्य विभागातून ९२.% गुण संपादन करून प्रथम क्रमांक पटकावून उत्तुंग यश संपादन केले आहे. याबद्दल तिचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे.
कुमारी तहुरा इम्तियाज चौगले हि इम्तियाज चौगले यांची मुलगी आणि नुरमोहम्मद चौगले यांची नात असून वडील कामानिम्मत परदेशात असून आईच्या मार्गदर्शनाखाली आणि अभ्यासामधील चिकाटी आणि जिद्द याच्या जोरावर यश संपादन करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
भविष्यामध्ये तिचे Chartered Accountant (C. A.) बनण्याचे तिचे स्वप्न आहे.तिच्या या यशाबद्दल गोवळकोट गाव आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात अभिनंदचा वर्षाव होत आहे.