चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे शुक्रवारी सायंकाळी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.


शुभारंभाच्या पहिल्याच शुक्रवारी सर्कस पाहण्यासाठी चिपळूण वासियानी चांगला प्रतिसाद दिला. उद्घाटन समारंभास चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबू ठसाळे,माजी सभापती शौकत मुकादम,मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे,सर्कसचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.संजीव,सर्कसचे व्यवस्थापक जयप्रकाश,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार ,आकाश पवार,हिंदुराव पवार,अशोक पवार, आणि मान्यवर होते उपस्थित
⭕पहिल्याच दिवशी चिपळूण वासियांचा उस्फुर्त प्रतिसाद