Monday, March 10, 2025

चिपळूण नागरीची ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५’ पुरस्कारासाठी निवड

अलिबाग येथे दि. १५ व १६ रोजी पुरस्कार होणार प्रदान

चिपळूण (प्रतिनिधी):– मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्या. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची ‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार दिनांक १५ व १६ रोजी अलिबाग येथे मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे. आर्थिक व्यवसायिकता सांभाळीत असतानाच गरजू, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो. इतकेच नव्हे तर ठेवींवर देखील योग्य व्याज दर दिला जात आहे. तर सामाजिक बांधिलकी देखील तितकीच जपली जात आहे.
चिपळूण नागरीच्या ५० शाखांच्या माध्यमातून आर्थिक व्यावसायिकता संभाळताना- पारदर्शक कारभार पाहताना दि. ३१ डिसेंबर २०२४ अखेर भाग भांडवल ७५ कोटी ७ लाख (एवढे मोठी भागभांडवल असणारी महाराष्ट्र तील संस्था), एकूण व्यवसाय २१०० कोटी आहे.

तसेच चिपळूण नागरीने सभासदांना बचतीची सवय लागावी यासाठी अनेक योजना सुरू केले आहेत. यामध्ये धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव, राष्ट्र अमृत महोत्सव ठेव, संकल्प ठेव, श्रावण मास ठेव, समृद्धी ठेव, गणेश ठेव, उत्कर्ष व धनसंचय ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त, बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धनी, दाम दुप्पट, दाम तिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत. एकंदरीत चिपळूण नागरीची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग या संस्थांकडे कोकण पतसंस्था भूषण पुरस्कारासाठी कोकण विभागातून अनेक अर्ज आले होते. यामध्ये चिपळूण नागरी पतसंस्थेचे एकत्रित व्यवसाय ५०० कोटी रुपयांच्या पुढे या वर्गवारीत येत असल्याने ‘चिपळूण नागरीची या वर्गवारीत कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५ या पुरस्कारासाठी या संस्थांनी निवड केली आहे. हा पुरस्कार दिनांक १५ व १६ फेब्रुवारी रोजी क्षात्रैक्य समाज हॉल, कुरुळ- अलिबाग येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, चिपळूण नगरीने स्थापनेपासूनच सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे गरजूंना सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा ठेवींवर योग्य व्याजदर यामुळे चिपळूण नागरीची अखंडितपणे यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. चिपळूण नागरीने आर्थिक पारदर्शकता सांभाळत सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. यामुळे चिपळूण नागरीला यापूर्वी देखील अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता पुन्हा एकदा संस्थेला पुरस्कार जाहीर झाला असून संस्थेच्या शिरपेचात मानाचा पुन्हा एकदा तुरा रोवला गेला आहे. यामुळे संस्थेची जबाबदारी आणखी वाढली आहे. ही जबाबदारी नक्कीच प्रामाणिकपणे पार पाडू, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला आहे.

चिपळूण नागरीची यशस्वी वाटचाल संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सभासद, हितचिंतकांच्या सहकार्याने सुरू आहे. या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरी वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Hot this week

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत चिपळूण शहरात महास्वच्छता अभियान

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या...

क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी कौतुकास्पद : खा.सुनील तटकरे

चिपळूण (ओंकार रेळेकर)क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी...

महाराष्ट्रात सहकारातून समृद्धी घडविण्याचे काम पतसंस्थांनी केले : अनिल कवडे

◾कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिपळूण नागरी पतसंस्था कोकण...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य

चिपळूण उबाठा शिवसेना आक्रमक  चिपळूण (ओंकार रेळेकर)छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक...

Topics

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत चिपळूण शहरात महास्वच्छता अभियान

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या...

क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी कौतुकास्पद : खा.सुनील तटकरे

चिपळूण (ओंकार रेळेकर)क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी...

महाराष्ट्रात सहकारातून समृद्धी घडविण्याचे काम पतसंस्थांनी केले : अनिल कवडे

◾कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिपळूण नागरी पतसंस्था कोकण...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य

चिपळूण उबाठा शिवसेना आक्रमक  चिपळूण (ओंकार रेळेकर)छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक...

फन एन फेअरच्या माध्यमातून रोट्रॅक्टने विक्रेत्यांना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले : प्रशांत यादव

चिपळूण (ओंकार रेळेकर)रोट्रॅक्ट फन एन फेअर मधून असंख्य विक्रेत्यांना...

धर्माचे शिक्षण न दिल्यानेच हिंदू युवती धर्मांधाच्या वासनांना बळी पडत आहेत : स्वाती खाड्ये , धर्मप्रचारक सनातन संस्था

चिपळूण (ओंकार रेळेकर)हिंदूंच्या महिला आणि युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img