Wednesday, January 22, 2025

जनतेच्या न्यायालयातूनच आम्हाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पुन्हा मिळवायचा आहे : आ.भास्कर जाधव

संपूर्ण महाराष्ट्रात मशाल पेटवून गद्दारी
गाडून टाका

चिपळूण (ओंकार रेळेकर) चार न्यायाधीश झाले तरीही सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळाला नाही आम्हाला आमचा पक्ष आणि धनुष्यबाण परत मिळालेला नाही जोपर्यंत भाजपा सरकार केंद्रामध्ये आहे तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आता तर उद्धव साहेबांनी जाहीर करून टाकलंय जर आपल्याला आपलं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष पुन्हा मिळवायचा असेल तर जनता जनार्दन रुपी न्यायालयात जावे लागेल आणि म्हणून जनतेनेच आता महाराष्ट्रभर मशाल पेटवून आपल्या एक एक मताने महाराष्ट्रातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिलेदार आमदार जास्तीत जास्त निवडून देऊन आपल्या मतदान रुपी न्यायाने आम्हाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पुन्हा मिळवून द्यायचा आहे.महाराष्ट्रात शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि इथे झालेली गद्दारी कायमची गाढून टाकण्यासाठी गुहागर विधानसभा मतदारसंघातून आपला हक्काचा आमदार म्हणून आपण मला पुन्हा विधानसभेत चांगल्या मतांनी निवडून पाठवा असे आवाहन गुहागर विधानसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ.भास्कर जाधव यांनी केले मतदारसंघातील चिपळूण नजीक असलेल्या एक्सेल फाटा येथे काल सायंकाळी झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर प्रचार सभेत आ.जाधव बोलत होते.
      धनुष्यबाणाची हकीगत सांगताना जाधव म्हणाले हे धनुष्यबाण आपल्याला सोडवायचा आहे आपली शिवसेना आपल्या सेनेचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही आहे आपल्या सेनेचे नाव शिवसेना आहे १९ जून १९६६ हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला त्या दिवशी शिवसेना नाव जाहीर झाले त्याचं नाव शिवसेना होतं  कुठेही जरी जाऊन विचारलं तरी शिवसेना कोणाची बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आज ती शिवसेना उद्धव साहेबांकडे नाही तर शिवसेना एकनाथ शिंदे कडे गेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाची स्थापना कोणी केली पवार साहेबांनी केली ना आज तो पक्षच पवार साहेबांचा नाही तो अजित पवारांचा आहे म्हणजे ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याचाच पक्ष नाही हे धनुष्यबाणाचा किस्सा तुम्हाला सांगतो मी भांडुपला आमदार रमेश कोरगावकर यांच्या सभे करता गेलो होतो आणि तिथून परत येतो तो मला  एका चॅनल  प्रतिनिधीचां फोन आला की जाधव  जाधव साहेब घात झाला मी बोललो काय झालं आपल्या शिवसेनेचे नाव गेलं आपल्याकडून आपली शिवसेना पण केली आणि आपले धनुष्यबाण त्यांच्याकडे गेला बोललो कसं काय झालं हे कसं काय झालं ज्यांनी गद्दारी केली त्यांना पक्ष निवडणूक आयोजकाने दिला शिवसेना वाढवली आम्ही पक्ष मोठा केला त्याच्यावर आंबे लागले ते चोर नेतात ते खाली पडले की चोरून नेतात आता आंबे काढले म्हणून आता ज्या झाडावर आंबे लागलेत ते आंब्याचे झाड त्यांचं झालं काय आंब्याचे झाड की झाडाचे आंबे झाडाचे आंबे ना आंब्याचे झाड नाही ना  पण इथे तर उलटा न्याय झाला आमदार खासदार हे झाडं लागली फळ आहेत हा किस्सा मी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल  यांच्याशी बोललो त्यांनी सुद्धा डोळ्यातून अक्षरशःअश्रू काढले ते म्हणाले हेच भास्कर तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर काही करता आले  असते आपण केस कोणाची शिवसेना ही एका लावलेल्या झाडाची फळ आहेत एखाद्या वेळेला त्या झाडाला फळे येणार सुद्धा नाहीत म्हणून काय त्या झाडावरची मालकी जाते काय म्हणून घात झाला मी ओळखलो आणि मी सावरलो आणि उद्धव साहेबांना फोन केला मी साहेब मी ऐकतोय खर आहे का साहेब म्हणाले भास्करराव  हे खर आहे  मी म्हणालो आता येतोय ते येऊ का तर साहेब म्हणाले आता येऊ नका उद्या या दुसऱ्या दिवशी आम्ही उद्धव साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेला उद्धव साहेब चष्म्यातून रुमाल सारखा डोळे पुसत होते मी विचारलं काय झालं साहेब काय झालं ते म्हणाले नाय भास्करराव चष्मा जरा बदललां आहे म्हणून  डोळ्यातून पाणी येते  बांधवांनो उद्धव साहेबांना आम्ही बघितलं चाळीस आमदार गेले उद्धव साहेबांचा चेहरा कधी पडलेला उतरलेला हाताश  झालेला मी बघितलेलं नाही तेरा खासदार गेले उद्धव साहेबांना कधी दुःख झालेलं बघितलेलं नाही एवढा मोठा खांद्यावरती ऑपरेशन झालं त्यातून ते बाहेर येतील असं वाटत नव्हतं पण  मात्र आधार घेऊन  उठायला लागले पण कधी उद्धव साहेब मनातून खचलेले पहिले नाहीत सरकार गेलं वर्षा बंगला सोडला त्याही वेळेला उद्धव साहेबांच्या सोबत होतो राज्यपालांकडे राजीनामा द्यायला गेले उद्धव साहेब पण उद्धवजींचा साहेबांचा चेहरा मी कधीही पडलेल्या पाहिले नाही पण त्या दिवशी उद्धवजी चेहरा फार रडत होत चेहरा पडला होता मी उद्धवजीना सांगितलं कितीही बोला पण आज चेहरा वेगळाच वाटतोय उद्धवजीचे त्यादिवशी अश्रू अनावर झाले त्यावेळी उद्धवजीच्या बाजूला बाळासाहेबांपासून असलेले रवी म्हात्रे हे होते त्यांचाही बाणकुटला उद्धवजींचाही बाण फुटला आम्ही सर्वजण रडायला लागलो पण त्याच वेळेला रवी म्हात्रे यांनी खिशातून एक वस्तू काढली अशी हातावर धरली आणि त्यांनी सांगितलं भास्करराव उद्धव साहेब रडतील तर काय करती १९८८ आली हा धनुष्यबाण आपल्याला निशाणी म्हणून मिळाली शिवसेनाप्रमुख आहेत होते त्यांनी त्या दिवसापासून हे धनुष्यबाण ही निशाणी ही देवाच्या बरोबर ठेवली होती. देवासोबत ते दररोज त्याची पूजा करायचे बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब त्याची रोज पूजा करायचे आज तो धनुष्यबाण देवाऱ्यातून बाहेर आला उद्धवसाहेब रडते काय करतील काय करतील या प्रसंगाचा मी साक्षीदार आहे.मतदान मशीनवर माझं नाव दोन नंबरला आहे माझी निशाणी मशाल आहे तीन नंबरला धनुष्यबाण आहे हे शिवसेनाप्रमुखांचे धनुष्यबाण चोरून नेलेले धनुष्यबाण आहे बाळासाहेबांच धनुष्यबाण आज चोरांनी चोरून नेलेला आहे जर त्याच्यावर मतदान केलं तर तुम्ही चोराचे साथीदार होणार  मग तुम्हाला चोरांचा साथीदार व्हायचंय काय की सत्याच्या बाजूने उभे राहायचे आहे अशी भावनिक साद देखील आ.जाधव यांनी घातली
बायांनो तुम्हाला तुमचा हा लाडका भाऊ आवडतो की ते भाऊ आवडतात  हा भाऊ किती गरीब असला तरी भाऊ कर्तुत्व संपन्न असेल आपला भाऊ चरित्र संपन्न असेल आपल्यावर भ्रष्टाचाराची रेघ नसेल आपला भाऊ हा दिलेल्या शब्दाला जागत असेल तर तो गरीब असला तरी आपल्या बहिणींना भावाच्या जागीच वाटतो प्रसंगात कुठेही तुम्हाला हाच भाऊ धावून येतो ना की ५० खोके  घेतलेला वाटतो मी पन्नास खोके घेतले नाहीत याचा मला अभिमान वाटतो असे आ.जाधव महिलांना उद्देशून म्हणाले.
आ.भास्कर जाधव,माजी जि.प अध्यक्ष विक्रांत जाधव,उबाठा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन आंब्रे,माजी नगरसेवक समीर,माजी जि.प सदस्या अरुणा आंब्रे, खेड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश काते, उपतालुकाप्रमुख महेश गोवळकर, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे,धामणदेवी विभाग प्रमुख राजेंद्र घाग,फैसल कास्कर,सुनील शिर्के, मोहन आंब्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष योगेश शिर्के,जाधव,डॉ.अनिल शिगवण,
श्री.लांबे, रिपब्लिकन पार्टी महासचिव उमेश पवार, हुसेन ठाकूर, अन्वर खान बशीर हमदुले, संजीवनी नरळकर,सुषमा पिळदणकर, अल्पसंख्यांक उपतालुका संघटक वहाब सैन,माचींद्रा गोवळकर,राजेंद्र घाग,
उपविभाग प्रमुख सतीश अंबरे जयवंत पालांडे रवींद्र गोवळकर प्रदीप धाडवे , पंचायत समिती माजी उपसभापती मोहन आंब्रे, राष्ट्रवादीचे अन्वर खान, मामां तळेकर, गुनदे चे विष्णुपंत आंब्रे, खेड तालुका सचिव बावा कदम आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची ही उपस्थिती लक्षणीय होती.

फोटो स्कॅपशन : महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना आ.भास्कर जाधव आणि सोबत विक्रांत जाधव,अंकुश काते आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया :  ओंकार रेळेकर)

Hot this week

चिपळूणमधील उद्योजक प्रकाश देशमुख मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी...

जगविख्यात इ एन टी सर्जन डॉ. मिनेश जुवेकर यांचे द्वारे अपरांत हॉस्पिटल येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन.

चिपळूण (पवन न्यूज)दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अपरांत हॉस्पिटल येथे...

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

Topics

चिपळूणमधील उद्योजक प्रकाश देशमुख मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी...

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

कोकणात वाळू विक्रीसाठीपरवानगी मिळावी : संदेश मोहिते

चिपळूण : कोकण विभागात वाळूसाठीकायदेशीर परवानगी द्यावी. तसेच निश्चित...

अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी कौतुकास्पद : आ.भास्कर जाधव 

चिपळूण (ओंकार रेळेकर)अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी...

चिपळुणात रांगोळी आणि केक स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : शिवसेनायुवसेनेच्यावतीने (ठाकरे) दि.२३ जानेवारी रोजी रांगोळीस्पर्धा आणि...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img