Thursday, April 17, 2025

जिल्ह्यात दीड दिवसाच्या बारा हजार गणरायांना निरोप

रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करीत रत्नागिरीत दीड दिवसाच्या तब्बल बारा हजार गणरायांना भाविकांनी निरोप दिला. रत्नागिरीच्या भाट्ये व मांडवी समुद्रकिनार्‍यासह ग्रामीण भागातील नद्यांवर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात पाच ठिकाणी सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात आला.

फुलांची उधळण करीत, ढोल ताशांच्या गजरात जिल्ह्यात 11 हजार 803 घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला तर 5 सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात खेडमध्ये 2, दापोली, लांजा व चिपळूण येथे एका सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात आला.

रत्नागिरीत मांडवी व भाट्ये समुद्रकिनार्‍यांसह तालुक्यातील ग्रामीण भागामध्येही पोलीस यंत्रणेने विशेष दक्षता घेत, बंदोबस्त ठेवला होता. पोलीस पाटलांकडून याबाबत विसर्जन मिरवणुकांची माहिती घेतली जात होती. शांततेत व सुरक्षितपणे गणरायांना निरोप देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन प्रयत्न सुरु होते. रत्नागिरीत सायंकाळी वरुण राजाचे आगमन झाल्याने अनेकांनी स्वत:च्या वाहनांमधूनच विसर्जनस्थळी नेऊन गणरायांना निरोप दिला.

Hot this week

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे २ विदयार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत

चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

Topics

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img