Thursday, April 17, 2025

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२५’ , दै. रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीप देवळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रतिवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रातील आपल्या योगदानातून समाजजीवन संपन्न करणाऱ्या मानवंतांना विविध पुरस्कार दिले जातात. रत्नागिरी खेड येथे मान्यवारांच्या उपस्थितीत हा पुरस्कार श्री दिलीप देवळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर गेली अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात भरीव असं कार्य करत आहे.‌ समाजातील सोशीत, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार असतो. आदर्श, निर्भिड पत्रकार अशी त्यांची ओळख असून आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. सामाजिक, साहित्यिक व सहकार क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोकण मराठी पत्रकार संस्थेचा ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे.
‘कोकण मराठी पत्रकार संस्थे’चा प्रथम वर्धापन दिन सोहळा व त्यानिमित्ताने कोकणवासिय पत्रकारांचा ‘स्नेहमेळावा’ येत्या रविवारी दि. 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता गणेश मंगल कार्यालय, काळकाई मंदिराच्या शेजारी, मु. पो.भरणे, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे मान्यवारांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने कोकणच्या पत्रकारितेतील अनेक ‘कोकणरत्नां’चा विविध पुरस्कारांनी गुणगौरव दिग्गज्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्यात कोकणातील नामवंत पत्रकारांना ‘पत्रकार भूषण’ आणि समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणार्‍या कोकणवासियांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, तथा दैनिक ‘प्रहार’चे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख अतिथि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग योगेश कदम, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु संजय भावे, दै. ‘पुढारी’चे निवासी संपादक शशिकांत सावंत, वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे व महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी कोकणातील वृत्तपत्रप्रेमी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन ‘कोकण मराठी पत्रकार संस्थे’चे संस्थापक, अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष संतोष धोत्रे, प्रमुख कार्यवाह दिलीप देवळेकर, यांनी केले आहे

Hot this week

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे २ विदयार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत

चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

Topics

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत चिपळूण शहरात महास्वच्छता अभियान

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img