आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचे आवाहन
चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने गेल्या ३२ वर्षांच्या कालखंडात सभासदांच्या हिताला प्राधान्य देत गरजूंना तात्काळ, सुलभ पध्दतीने कर्जपुरवठा तर ठेवीदारांच्या ठेवींवर योग्य व्याजदर तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत या संस्थेची यशस्वी वाटचाल राहिली आहे. आता या संस्थेने हे ठेवीदार व कर्जदारांसाठी सुवर्णसंधी आणली आहे. सक्षम महिला सक्षम कुटुंब व शेती पूरक व्यवसाय कर्ज योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी सांगितले की, चिपळूण नागरी पतसंस्थेने पहिल्या दिवसापासून सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. तसेच ठेवींवर योग्य व्याजदर देण्याबरोबरच गरजू कर्जदारांना तात्काळ सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे या कर्जदारांची अडचण दूर होण्यास मदत झाली आहे तर काही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करून या तरुणांना स्वावलंबी बनवण्यास हातभार लावला आहे. तर या संस्थेच्या आर्थिक वाटचाली बाबत माहिती देताना ते म्हणाले की, चिपळूण नागरीच्या ५० शाखांच्या माध्यमातून आर्थिक व्यावसायिकता संभाळताना- पारदर्शक कारभार पाहताना दि. ३१ डिसेंबर २०२४ अखेर भाग भांडवल ७५ कोटी ७ लाख (एवढे मोठी भागभांडवल असणारी महाराष्ट्र तील संस्था), स्वनिधी १६० कोटी ३५ लाख, ठेवी १०८७ कोटी ६१ लाख, कर्जे ९९५ कोटी ०३ लाख एकूण व्यवसाय २१०० कोटी आहे, अशी माहिती दिली.
दरम्यान, चिपळूण नागरीने सभासदांना बचतीची सवय लागावी यासाठी अनेक योजना सुरू केले आहेत. यामध्ये धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव, राष्ट्र अमृत महोत्सव ठेव, संकल्प ठेव, श्रावण मास ठेव, समृद्धी ठेव, गणेश ठेव, उत्कर्ष व धनसंचय ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त, बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धनी, दाम दुप्पट, दाम तिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत.
तर आता चिपळूण नागरीने ठेवीदारांसाठी सुवर्णसंधी आणली आहे. यामध्ये मुदतबंद ठेव योजना सुरू केली असून १ ते २ महिन्यांसाठी ९ टक्के व्याजदर तर ३ ते ११ महिन्यांच्या ठेवींवर ९.५० टक्के इतका भरघोस व्याजदर दिला जाणार आहे.
तर दुसरीकडे महिलांच्या आर्थिक सक्षमतेला चालना मिळावी यासाठी सक्षम महिला सक्षम कुटुंब कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी अल्प १४ टक्के व्याजदर असणार आहे. तसेच कोकणातील शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे यासाठी चिपळूण नागरीने गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला आहे. हा कर्ज पुरवठा आता देखील सुरू असून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाच्या कर्ज योजनेत योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.
चौकट
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन
२०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. सहकारी चळवळीच्या महत्त्वाला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी आणि सहकाराच्या माध्यमातून टिकावू विकास, सामाजिक न्याय आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ही घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ही कार्यक्रमाचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.