Thursday, June 5, 2025

पीएमसी बँकेतील ग्राहकांना लवकर न्याय द्या

खासदार रविंद्र वायकर यांनी बँकिंग कायदा (संशोधन) विधेयक २०२४ वर मांडले मत
 
नवी दिल्ली :आरबीआई यंत्रणेच्या असफलतेमुळे पीएमसी बँक घोटाळ्यातील ग्राहकांचे हक्काचे कोट्यवधी रुपये गेल्या अनेक वर्षापासून अडकले असून ते त्यांना तत्काल देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेऊन खातेदारांना न्याय द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत बँकिंग कायदा (सुधारणा) विधेयक २०२४ वर बोलताना केली. खातेदारांच्या न्याय, हित रक्षणासाठी तसेच सहकारी बँकेतिल ग्राहकांसाठी डिपॉजिट इन्शुरेंस योजना लागू करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकसभेत मांडण्यात आलेल्या बँकिंग कायदा (सुधारणा) विधेयक २०२४ चे समर्थन करताना खासदार रविंद्र वायकर यांनी आपले विचार व सूचना मांडल्या. पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे ग्राहकांनी आपल्या मेहनतीचे बँकेत ठेवलेले रुपये मिळणे कठीण झाले आहे. आरबीआई यंत्रणेला हा घोटाला रोखण्यात अपयश आले. यूनिटी बँकेतील ग्राहकांची पण तीच परिस्थिति आहे. यस बँकेला केवळ २० दिवसांमध्ये १५०० कोटी रुपये देऊन वाचवण्यात आले. परंतु पीएमसी बँक ज्यांचा एनपीए ६००० हजार करोंड होता व ज्यांचे १० लाखापेक्षा जास्त ग्राहक होते, आशा ग्राहकांना बेलआउटचा लाभ देण्यात आला नाही. एचडीआयएल कंपनीची संपत्ति व कर्जाच्या एकदाच सेटेलमेन्ट मूळे हजारो कोटी रुपयांची वसूली झाली आहे. हे संकट नुसते वित्तीय नसून, नैतिक आणि सामाजिक पण असल्याचे मत, खासदार वायकर यांनी व्यक्त केले. या घोटाळ्याची बंधित ग्राहकांना त्यांची संपूर्ण जमा रक्कम तत्काळ देण्यात यावी. एनसीएलटी सारख्या संस्थेमार्फत अशी प्रकरणे निकाली काढण्यात यावी.   बँकेतील एनपीए खात्यांची ओळख करण्यासाठी रिस्क मॅनेजमेंट सिस्टमला सक्षम करण्यात यावे. सायबर फसवणुकीपासून ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी बँकांना एआय वर आधारित सुरक्षा प्रणाली लागू करण्यात यावी. ग्रामीण भागात बँकांचे जाळे वाढवणे तसेच एटीएमची संख्या वाढवण्यात यावी. सहकारी बँकांना आधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष फंड उभारला पाहिजे, आशा सूचनाही खासदार रविंद्र वायकर यांनी या बिलावर आपले मत व्यक्त करताना दिल्या.

Hot this week

माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस १ जून रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार

चिपळूण (ओंकार रेळेकर)माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस...

प्रकाश इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश देशमुख यांचा श्रीलंका देशात कोलंबो येथे वीज ट्रान्समिशन लाईन आणि सबस्टेशनचा करार

कोकणातील उद्योजकाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगात गरुड भरारी चिपळूण (ओंकार रेळेकर)...

अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा …….म्हणजे बने साहेब : श्रीकृष्ण खातू माजी आमदार डॉ. श्री.सुभाष बने वाढदिवस विशेष

===================शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला...

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

Topics

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

बांदल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी...

अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश बने केरळ मध्ये दाखल

स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार नेतृत्व चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण संगमेश्वर...

वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचा चिपळूण बाजारपेठेत शुभारंभ

प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती चिपळूण :...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img