Monday, June 2, 2025

प्रकाश इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश देशमुख यांचा श्रीलंका देशात कोलंबो येथे वीज ट्रान्समिशन लाईन आणि सबस्टेशनचा करार

कोकणातील उद्योजकाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगात गरुड भरारी

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण स्थित असलेले कोकणातील प्रतिष्ठित उद्योगपती प्रकाश इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश देशमुख यांनी वीज मंडळात तील एका कामासंदर्भात श्रीलंका देशातील कोलंबो येथे श्रीलंका देशासोबत कामाचा करारनामा केला आहे यापूर्वी त्यांनी भारत देशा पलीकडे नेपाळ देशांमध्ये देखील आपल्या प्रकाश इलेक्ट्रिकल्स वर्क्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिक क्षेत्रातील कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.

चिपळूण शहरातील अतिथी हॉटेल व प्रकाश इलेक्ट्रिक इंडिया कंपनी, मालक, तथा मराठा समाजाचे
प्रमुख दानशूर प्रकाश देशमुख यांनी इलेक्ट्रिक क्षेत्रात आंतराष्ट्रीय स्तरावर भरारी घेत श्रीलंका देशात आपल्या कंपनी साठी मोठा करार करून काम मिळवले आहे या करारावर गुरुवारी त्यांनी स्वाक्षरी केल्या. प्रकाश इलेक्ट्रिक इंडिया कंपनी अंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली आहे त्याच्या उदयोग क्षेत्रातील यशस्वी अंतरराष्ट्रीय पदार्पणामुळे सर्वच थरातून कौतुक होत आहे.यापूर्वी त्यांनी नेपाळ देशासोबत ही असाच करार करून आपल्या कंपनीच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी केली होती. शिवाय नेपाळ देशामध्ये आजही त्यांची इलेक्ट्रिक क्षेत्रातील कामे सुरू आहेत. कोलंबो येथे वीज ट्रान्समिशन लाईन आणि सबस्टेशनचा करार श्रीलंका इलेक्ट्रीक इंजिनिअरिंग बोर्ड सीईबी आणि प्रकाश इलेक्ट्रीक इंजिनिअरिंग कंपनी इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्यात हा करार झाला.कोलंबो येथे श्रीलंका सरकारी वीज मंडळ म्हणजेच सीईबी आणि प्रकाश इलेक्ट्रीक इंजिनिअरिंग कंपनी इंडिया यांच्यात करारावर स्वाक्षरी झाल्या देशमुख याची प्रकाश इलेक्ट्रिक इंडिया कंपनी गत अनेक वर्षे महाराष्ट्रात कार्यरत असून, त्याच बरोबर त्याचा हॉटेल व्यवसायात यशस्वी पावले टाकली आहेत. व्यवसाया बरोबर मराठा समाजाच्या संघटन व विकासासाठी सतत कार्यरत असून कोरोना
सारख्या महाभयंकर काळात चिपळूण शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात महत्वपूर्ण योगदान देशमुख यांनी दिले होते आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊन उदयोजक क्षेत्रात आपलं नाव कोरले असून भविष्यात राज्या व देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे उद्योजक प्रकाश देशमुख यांनी सांगितले

फोटो : श्रीलंका देशातील कोलंबो येथील वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी करारनामा करताना उद्योजक प्रकाश देशमुख आणि कोलंबो मधील अधिकारी छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Hot this week

माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस १ जून रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार

चिपळूण (ओंकार रेळेकर)माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस...

अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा …….म्हणजे बने साहेब : श्रीकृष्ण खातू माजी आमदार डॉ. श्री.सुभाष बने वाढदिवस विशेष

===================शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला...

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

बांदल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी...

Topics

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

बांदल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी...

अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश बने केरळ मध्ये दाखल

स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार नेतृत्व चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण संगमेश्वर...

वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचा चिपळूण बाजारपेठेत शुभारंभ

प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती चिपळूण :...

गोवळकोटची सुकन्या ताहुरा इम्तियाज चौगले वाणिज्य विभागातून प्रथम

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img