Saturday, April 19, 2025

प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेत रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राज्यात प्रथम

रत्नागिरी:- महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेत 99 टक्के गुण मिळवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथम स्थान पटकावले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने प्रथम वर्ष एमबीबीएसचा निकाल काल 24 सप्टेंबर रोजी जाहीर केला. यामध्ये राज्यातील पहिल्या ५ वैद्यकीय महाविद्यालयांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी 99 टक्के, आर्म फोर्सेस मेडीकल कॉलेज, पुणे 96 टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, 95.30 टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर 95.30 टक्के, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर 95.20 टक्के, बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे 95.18 टक्के.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या पहिल्या तुकडीतील शरीररचना शास्त्रात 1, शरीरक्रीयाशास्त्रमध्ये 2 आणि जीवरसायनशास्त्र मध्ये 15 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. एमबीबीएसच्या पहिल्याच तुकडीने मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी व अध्यापक वर्गाचे विशेष कौतुक केले. यशाची ही वाटचाल अशीच पुढे चालू ठेवून जिल्ह्याच्या नाव लौकीकात भर घालावी, अशा शब्दात पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Hot this week

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल जाधव

चिपळूण : माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती श्री.बाळशेठ...

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे २ विदयार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत

चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

Topics

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल जाधव

चिपळूण : माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती श्री.बाळशेठ...

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img