Thursday, June 5, 2025

प्रशांत यादवांच्या वाढदिवसानिमित्त संगमेश्वरात मोफत नेत्र तपासणी शिबीर

देवरुख-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत बबन यादव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत यादव मित्रमंडळाकडून संगमेश्वर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व चस्मा फ्रेम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दिनांक २४ डिसेंम्बर रोजी देवरुख शहरातून या शिबिराची सुरुवात होत आहे.
प्रशांत यादव यांचा वाढदिवस ५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.त्यानिमित्ताने चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून प्रशांत यादव मित्रमंडळ व पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमांची जोरदार तयारी करत आहेत.चिपळूणमध्ये ५ ते ९ जानेवारी दरम्यान कृषी व पशुधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.तर संगमेश्वर तालुक्यात देखील आरोग्य शिबीरे तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.एकूणच हा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. प्रशांत यादव मित्रमंडळाच्या वतीने संगमेश्वर तालुक्यात मोफत नेत्र तपासणी व चस्मा फ्रेम शिबिराचे आयोजन विविध भागात करण्यात आले आहे.त्यानुसार देवरुख येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नेत्र तपासणी व चस्मा फ्रेम शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तसेच २५ डिसेंम्बर रोजी तुळसणी,२७ डिसेंबर रोजी ताम्हाणे,२८ डिसेंबर रोजी बुरंबी,२९ डिसेंम्बर रोजी माखजन आणि ३० डिसेंबर रोजी तुरळ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण येथील कुलकर्णी नेत्र रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर व संपूर्ण टीम या शिबिरात सहभागी होऊन तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.तर न्यू ऑप्टिकल मिरज यांच्या वतीने चस्मा फ्रेम मोफत मिळणार आहे.काचेचे मात्र पैसे द्यावे लागणार आहे.गरजुनी या शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशांत यादव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले असून 7507178827 या क्रमांकावर संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

Hot this week

माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस १ जून रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार

चिपळूण (ओंकार रेळेकर)माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस...

प्रकाश इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश देशमुख यांचा श्रीलंका देशात कोलंबो येथे वीज ट्रान्समिशन लाईन आणि सबस्टेशनचा करार

कोकणातील उद्योजकाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगात गरुड भरारी चिपळूण (ओंकार रेळेकर)...

अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा …….म्हणजे बने साहेब : श्रीकृष्ण खातू माजी आमदार डॉ. श्री.सुभाष बने वाढदिवस विशेष

===================शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला...

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

Topics

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

बांदल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी...

अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश बने केरळ मध्ये दाखल

स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार नेतृत्व चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण संगमेश्वर...

वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचा चिपळूण बाजारपेठेत शुभारंभ

प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती चिपळूण :...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img