चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी ओळख असलेली पेरेंट्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. एम. बांदल स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
दहावीच्या परीक्षेत एकूण ४० विद्यार्थी समविष्ठ झाले होते. या मध्ये कु.डिंपल जीवाराम चौधरी हिने ९५.६० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकवला. कु. अर्णव जगदीश शिंदे ह्याने ९०.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकवला. कु. यशोदीप शशिकांत मोहरीर आणि श्रेया मनोज काजवे ह्यांनी ८९.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला. कु. अंतरा संदीप निर्मल हिने ८८.४० टक्के व कु. मोहम्मद अल्ताफ तुरुक ह्याने ८६.४० टक्के गुण मिळवून अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकवला.



एकूण विद्यार्थ्यांपैकी विशेष श्रेणी मध्ये १४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये १३ विद्यार्थी तसेच द्वितीय श्रेणीमध्ये १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.ही शाळा विनाअनुदानित तत्वावर चालवली जाते. असे असले तरी इतर शाळांच्या तुलनेत या शाळेत विद्यार्थांना द्यावे लागणारे शैक्षणिक शुल्क कमी आहे. त्यामुळे या शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे अतिशय सामान्य कुटुंबातील असतात. सामान्य कुटुंबातील मुलांना देखील कमी खर्चात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेता आले पाहिजे, हा विचार करून तसेच ज्या विद्यार्थांना कमी गुण असल्याच्या कारणास्तव अन्य शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही त्यांना या शाळेत सामावून घेते आणि शाळेचे शिक्षक अशा विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन मेहनत घेतात. त्यामुळेच दरवर्षी शाळेचा निकाल १०० टक्के लागतो. यावर्षी देखील शाळेने ही परंपरा राखली आहे.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक व. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संस्थेचे चेअरमन मा. आमदार श्री. भास्कराव जाधव तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. यशाचे सर्व श्रेय शाळेतील अत्यंत मेहनती शिक्षकांना जाते, अशी प्रतिक्रिया चेअरमन श्री. भास्करराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.