
◾कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिपळूण नागरी पतसंस्था कोकण पतसंस्था भूषण पुरस्काराने सन्मानित
चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रात सहकारातून समृद्धी घडविण्याचे काम पतसंस्थांनी केले आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी महाराष्ट्र राज्य निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे यांनी केले. कोकण विभागातील नागरिक पतसंस्थाचा रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी क्षात्रैक्य समाज हॉल, कुरुळ- अलिबाग येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अनिल कवडे बोलत होते.
मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्या.अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे कोकणातील एकूण अठ्ठेचाळीस पतसंस्थाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य लोकप्रिय चिपळूण नागरी सह पतसंस्थेला कोकण पतसंस्था भूषण पुरस्काराने सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख स्वरूपाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे,कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबागचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, सेवानिवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे ,शैलेश नाईक, कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग अध्यक्ष नंदकुमार चाळके, शिववैभव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे सेक्रेटरी संतोष थेराडे,सुरेश पाटील,संतोष इचके वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन प्रशांत यादव आणि मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.उद्याचे तुम्ही या विषयावर अनिल कवडे यांनी व्याख्यान सादर केले.कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्या संदर्भात सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कमळ नागरी सह पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके, सुरेश पाटील यांनी आपल्या भाषणात पतसंस्थांनी ग्राहकांशी जपायचे नाते आणि व्यवसाय वाढी संदर्भात मार्गदर्शन करून शासनाने सुद्धा पतसंस्थांच्या विषयात सहकार्य करावे अशा भावना व्यक्त केल्या. पतसंस्थांनी आपल्या सभासदांबरोबर कशाप्रकारे कामकाज केले पाहिजे याविषयी महत्त्व पटवून देताना श्री. कवडे यांनी संत महात्मे यांची उदाहरणे देऊन सेवा दिली पाहिजे या गोष्टीची आठवण करून दिली सहकार आयुक्त असून सुद्धा सहकाराचा मला कार्यकर्ता राहिला आवडते सहकार ही सर्वसामान्य नागरिकांची गरज आहे ती प्रामाणिकपणे आपण सर्वांनी पूर्ण करायला पाहिजे असे ते म्हणाले.सहकार आयुक्त शैलेश कोथमीरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पतसंस्थांनी आर्थिक व्यवहार कशा प्रकारे सांभाळावेत गुंतवणूक कशाप्रकारे करावी पदाधिकारी संस्थेचे कर्मचारी यांनी आर्थिक डोलारा सांभाळताना कशाप्रकारे काळजी घ्यावी गुंतवणूक संस्थेचा सीआरआर, सीआरए, आरएसएल, सिडी रेषो हे सांभाळताना काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन आणि सूचना केली.एखादा उत्तम आयोजक एखादा संघटक ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने तुळपुळे यांचे काम आम्ही जवळून पाहिले आहे निवडणुकीत देखील त्यांनी अत्यंत तळमळीने नियोजन केले होते .पतसंस्थांना एक चांगल्या प्रकारे ज्ञान मिळावं चांगलं व्यासपीठ मिळावं ही तळमळ निश्चितपणे त्यांच्या मनात असते.कोकणी माणूस प्रामाणिकपणे कर्ज भरणारा माणूस आहे हिशोबाला अतिशय चोख असणारा माणूस आहे कोकणात पश्चिम महाराष्ट्र प्रमाणेच सहकार क्षेत्र वाढलं पाहिजे यासाठी संघटित प्रयत लावणे गरजेचे आहे कोकणात सहकारने फार मोठीचे झेप घेतली पाहिजे.तुळपुळे यांनी भावना व्यक्त केल्या प्रमाणे सरकारच्या वतीने ज्या ज्या वेळी सहकार्य लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे आश्वासन पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या भाषणात बोलताना दिले.
मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था मर्या.अलिबाग या संस्थांकडे कोकण पतसंस्था भूषण पुरस्कारासाठी कोकण विभागातून अनेक अर्ज आले होते. यामध्ये चिपळूण नागरी पतसंस्थेचे एकत्रित व्यवसाय ५०० कोटी रुपयांच्या पुढे या वर्गवारीत येत असल्याने ‘चिपळूण नागरीची या वर्गवारीत कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५ या पुरस्कारासाठी या संस्थांनी निवड करण्यात आली होती.या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, चिपळूण नगरीने स्थापनेपासूनच सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे गरजूंना सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा ठेवींवर योग्य व्याजदर यामुळे चिपळूण नागरीची अखंडितपणे यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. चिपळूण नागरीने आर्थिक पारदर्शकता सांभाळत सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे.यामुळे चिपळूण नागरीला यापूर्वी देखील अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.आता पुन्हा एकदा संस्थेला पुरस्कार जाहीर झाला असून संस्थेच्या शिरपेचात मानाचा पुन्हा एकदा तुरा रोवला गेला आहे.यामुळे संस्थेची जबाबदारी आणखी वाढली आहे.ही जबाबदारी नक्कीच प्रामाणिकपणे पार पाडू, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला .चिपळूण नागरीची यशस्वी वाटचाल संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सभासद, हितचिंतकांच्या सहकार्याने सुरू आहे. हा पुरस्कार स्वीकारताना पतसंस्थेचे चेअरमन श्री.सुभाषराव चव्हाण, सौ. स्मिताताई चव्हाण,मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना यादव, वाशिष्ठ डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, संचालक अशोक साबळे, सोमा गुढेकर, राजेंद्र पटवर्धन, रविंद्र भोसले, वैभव चव्हाण,अविनाश गुढेकर,महेश खेतले,संदीप पाटील,स्वामिनी यादव,व्यवस्थापक प्रशांत वाजे,फैसल पिलपिले,रुपेश आवले आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
फोटो : कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष गिरीश तुळपूळे यांच्या हस्ते कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार स्वीकारताना चिपळूण नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुभाष चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना यादव,संचालक स्मिताताई चव्हाण,उद्योजक प्रशांत यादव आणि मान्यवर छायाचित्र दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)