चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे विदयार्थी कु. अभिराज गार्डी इयत्ता १ली याने राज्यात ८ वा क्रमांक पटकावला तर कु. सौम्या दाभोळकर इयत्ता ४थी हिने राज्यात ९३ वा क्रमांक मिळवला तसेज बाकी ६५ विदयार्थ्यानी देखील या परीक्षेत यश संपादन केले. यशस्वी विदयार्थ्याचे स्कूलच्या संचालिका सौ. सायली भोजने, पूजा खताते, मुख्याध्यापक श्री. राकेश भूरण, सौ. नेहा महाडिक, श्री. मुकुंद ठसाळे व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
