चिपळूण (ओंकार रेळेकर)माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस १ जून रोजी साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल येथे विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

शिवसेनेची धडाडती तोफ अशी माजी आमदार डाँ. सुभाष बने यांची ओळख आहे. आजही श्री. सुभाष बने यांचा तालुक्यात दबदबा आहे. त्यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याहीवर्षी विविध कार्यक्रमांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये दि. १ जून रोजी सकाळी ८.३० वा. साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार व पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता दहावीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कँरमपट्टू आकांक्षा कदम हीचाही यथोचित सत्कार केला जाणार आहे.स. १० वा. आंगवली येथील आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला श्री. सुभाष बने उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते स. ११.३० वा. कुंडी येथील कुलदैवत व ग्रामदेवतेचे आशिर्वाद घेणार आहेत. दु. १ वा. बेलारी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बेलारी आदर्श विद्यामंदिर येथे सुभाष बने यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल येथे सुभाष बने कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत. सायंकाळी ४ वा. देवरूख तायक्वाँदो क्लबच्या वतीने सुभाष बने यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ६. वा. तालुक्यातील विविध मान्यवरांच्या शुभेच्छा सुभाष बने स्विकारणार आहेत. अशाप्रकारे माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात येणार आहे.