Thursday, April 17, 2025

मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगेची माघार

 मुंबई:- राज्यातील विधानसभा निवडणुकीतील आताच्या घडीची मोठी बातमी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता.

पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. 288 जागांवर निवडूक लढण्याची तयारी जरांगेंनी केली होती. कालपासून ते 13- 14 जागांवर लढणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. मुस्लीम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींकडून यादी न आल्याने आपण लढणार नाही, असं जरांगे म्हणालेत.

मनोज जरांगेनी का घेतली का घेतली माघार?

काल दिवसभर मतदारसंघानुसार सगळ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघ सुद्धा ठरले, काही कमी तर काही वाढले असतील. मराठा समाजाने मतदानावर लढायचं आहे. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही. लढायचं जमेल का? यादीच नाही म्हणल्यावर… एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे एकटयाने कसं लढायचं. यावर रात्री आमची चर्चा झाली. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून घेतलेलं बरं राहीन, असं मनोज जरांगे म्हणालेत.

मनोज जरांगे काय म्हणाले?

एका जातीवर निवडणूक लढवून जातीचं हसू करून घेऊ का? राजकारण हा आमचा कुठं खानदाणी धंदा आहे… माघार घेणारी औलाद नाही आमची… एका जातीवर निवडून येत नाही, म्हणून उमेदवार देणार नाही. हा गनिमी कावा आहे. मी कालपासून सांगतोय, तिघांचं समीकरण आहे, पण यादीच आली नाही, समाजाला एक सांगणं आहे,तुमच्या मतदारसंघातल्या एकाला मदत करायचं तर करा पण त्याच्याकडून लिहून घ्या, असं मनोज जरांगे म्हणालेत.

आम्हाला एका जातीवर शक्य नाही, ते दोन्ही पण बांधवच आहेत. ते पण नवीन आहेत आणि मी पण… काल यादी यायला पाहिजे होती पण नाही आली, मग लढायचं कसं? राज्यतल्या सर्व भावांना सांगतो सगळे जण अर्ज काढून घ्या. मुस्लिम आणि दलित उमेदवारांची यादी न आल्यामुळे, आणि एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत म्हणून उमेदवार देणार नाहीत. सज्जाद नोमानी यांची यादी आली नाही. निवडणूक लढवायची नाही पूर्ण पडायचे आहे. आपले अर्ज लवकर काढून घ्या, आपण कोणत्याही पक्षला पाठिंबा दिला नाही. एका जातीवर लढणं साधी सोप्पी गोष्ट नाही, असं जरांगे म्हणाले आहेत.

Hot this week

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे २ विदयार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत

चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

Topics

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img