बाळासाहेब माने यांच्या प्रचार्थ कोकणातील पहिलीच सभा
रत्नागिरी : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या दि. 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. कोल्हापूर येथे महालक्ष्मी मातेचे दर्शन घेवून ते प्रचाराचा शुभारंभ करतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ श्री. ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी लोकसभेला कोकणातील दोन्ही मतदार संघांतून महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. दि. 17 नोव्हेंबर रोजी मुंबईत त्यांची सांगता सभा होणार आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उबाठाने माजी आमदार बाळासाहेब माने यांना उमेेदवारी दिली आहे. ना. उदय सामंत यांच्या समोर भाजपमधून तीनवेळा लढणारे बाळसाहेब माने या वेळी प्रथमच उबाठा शिवसेनतून ना. उदय सामंत यांच्या समोर लाढत आहेत, तर ना. सामंतहेही शिवसेनेतून रिगणात उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी उभाठामार्फत सुरु असून सभेला विक्रमी गर्दी करण्याची तयारी करण्यात आली आहे. या साभेला उद्धव ठाकरेंसाबत शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. या सभेत श्री.ठाकरे कोणावर निशाणा साधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.