Wednesday, January 22, 2025

शिवसेना ठाकरे गटाच्या उदय बने यांची बंडखोरी

रत्नागिरी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी बंडाळी उफाळून आली आहे. माजी जि.प. अध्यक्ष उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी उदय बने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उदय बने हे इच्छूक होते. त्यांनी या मतदारसंघात उमेदवारीसाठी दावा केला होता. काही विभागप्रमुखांच्या सह्यांचे पत्रदेखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते. पण मातोश्रीवर काही पदाधिकार्‍यांशी प्रत्यक्ष संवाद साधत असताना अनेकांनी पक्षप्रमुख निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असे सांगितल्याने बने यांच्या उमेदवारीत अडसर निर्माण झाला होता. त्याचवेळी भाजपमधून आलेले माजी आ. बाळ माने यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला आणि शिवसेनेतील बंडाळी अधिकच उफाळून आली.
बाळ माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याने उबाठामध्ये नाराजीसत्र सुरूच होते. उबाठामधील काही शिवसैनिक या निर्णयामुळे नाराज झाले होते. बने यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी लावून धरली होती. त्यामुळे उदय बने अपक्ष उमेदवारी दाखल करणार का? याबाबत चर्चांना पेव फुटले होते. अखेर मंगळवारी शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नाराज असलेले उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीसह महायुतीमध्येदेखील खळबळ उडाली आहे. एक सच्चा शिवसैनिक म्हणून बने यांची ओळख आहे. चार नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे उदय बने यांची मनधरणी करण्यासाठी आता थेट मातोश्रीवर प्रयत्न होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Hot this week

चिपळूणमधील उद्योजक प्रकाश देशमुख मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी...

जगविख्यात इ एन टी सर्जन डॉ. मिनेश जुवेकर यांचे द्वारे अपरांत हॉस्पिटल येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन.

चिपळूण (पवन न्यूज)दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अपरांत हॉस्पिटल येथे...

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

Topics

चिपळूणमधील उद्योजक प्रकाश देशमुख मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी...

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

कोकणात वाळू विक्रीसाठीपरवानगी मिळावी : संदेश मोहिते

चिपळूण : कोकण विभागात वाळूसाठीकायदेशीर परवानगी द्यावी. तसेच निश्चित...

अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी कौतुकास्पद : आ.भास्कर जाधव 

चिपळूण (ओंकार रेळेकर)अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी...

चिपळुणात रांगोळी आणि केक स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : शिवसेनायुवसेनेच्यावतीने (ठाकरे) दि.२३ जानेवारी रोजी रांगोळीस्पर्धा आणि...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img