Thursday, June 5, 2025

शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गद्दारी केलेल्या  आमदारांना आपण पाडायचे आहे : आ.भास्कर जाधव

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेनेच्या ४० आमदारांनी गद्दारी केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गद्दारी केलेल्या चाळीस आमदारांना देखील  आपण पाडायचे आहे.असे आवाहन आ.भास्कर जाधव यांनी केले.

अनेकांची भातं शेतामध्ये आहेत, सकाळपासून गरम होत होतं पावसाचे वातावरण होते, ही सर्व माहिती असताना देखील भात शेतीची कामे असताना देखील आपण ग्रामस्थ हजारोच्या संख्येने आला आहात त्या अर्थी मी पन्नास हजाराच्या मताधिक्याने निवडून येणार यावर तुम्ही शिक्का मोर्तब केले आहेत असा विश्वास गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उबाठा शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

         शिवसेना उबाठा महाविकास आघाडीचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी चिपळूण तालुक्यातील कळवंडे गावी मालदोरी जिल्हा परिषद गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा कळवंडे येथील उद्योजक वसंत उदेग यांच्या वर्षाव निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार जाधव बोलत होते.आ.भास्कर जाधव ,जि.प माजी सदस्या मीनल काणेकर,उद्योजक वसंत उदेग,ज्येष्ठ शिवसैनिक अशोक नलावडे,बळीराम मोरे,शिवसेना तालुका प्रमुख पप्या चव्हाण,सुभाष मोहिते,सुशीला पवार आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

         माजी पंचायत झाली आहे की मी कोणावर बोलू माझ्या समोर माझ्यासह सात जण उभे आहेत उरलेले सहा जणांना तुम्ही कधी पाहिले आहेत का उगाचच त्यांचे नाव घेऊन त्यांना मोठं का करू  शिंदे शिवसेनेचे नेते गुहागरात आले ते काय माझ्यावर बोलले नाहीत राज ठाकरे आले ते काय माझ्यावर बोलले नाहीत रामदास भाई पण माझ्यावर काय बोलत नाहीत मग मी टीका कोणावर करू अडचणीच्या काळात सुखदुःखात तुमच्या सोबत कोण असतो त्याला मतदान करायचे की आता निवडणुकीपुरती आलेले आहेत त्यांना त्यामध्ये माझी थोडी अडचण झाली आहे की समाचार कोणाचा घेऊ अशा शब्दात आ.जाधव यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.मी कधी कोणाच्या जातीपातीवर बोलत नाही त्यावर राजकारण आयुष्यात केलं नाही माझ्या कार्यकर्त्यांना देखील सांगत असतो समाजात वावरताना सर्व समाज घटकांमध्ये सर्व धर्मामध्ये स्वतःसाठी मानाचे पान निर्माण करा असे आवाहन देखील भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांना केले.

आ. भास्कर  जाधव आपल्या भाषणात म्हणाले की, 

शिवसेनेच्या ४० आमदारांनी गद्दारी केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चाळीस आमदारांना आपण पाडायचे आहे.आपल्या मतदार संघात जातीचा आधार घेत काही उमेदवार मते मागीत आहेत. त्याकडे आता फार लक्ष देऊ नका. आता कोणी जातपात मानत नाही, सर्वजण आपापसातील आपुलकी व ओलावा जपत असतो. काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी आता लोक उभे राहातात.

माझ्यासोबत ९० टक्के कुणबी समाज आहे.मागच्या वेळी बेटकर यांना ५२ हजार मते मिळाली केवळ कुणबी समाजाची नव्हती, तर सर्वच समाजाच्या मतदारांची होती. आता लोकांना सत्य माहीत आहे. कोरोनासारख्या महामारीत व अडचणीच्या काळात कोण धावून आले तेही लोक जाणतात. एखाद्या कार्यकर्त्याकडे मी गेलो नाही तर

कोणी नाराज होऊ नका, मीही माणूस आहे. तुम्हीही मला समजून घेतले पाहिजे.पक्षफुटीनंतर मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय अनेकांना अंगावर घेतोय,विधिमंडळात सत्ताधाऱ्यांना नामोहरम केले असे असताना राज्यभर तुमच्या आमदाराचे कौतुक झाले. गेल्या ४३ वर्षाच्या कारकीर्दीत माझ्या अंगावर लहानसा डाग नाही, याचा तुम्हाला अभिमान आहे की नाही. मी पक्षाशी एकनिष्ठ

राहिलो, मागच्यावेळी मला मंत्रीमंडळात संधी मिळाली नाही, पण आता मी मंत्री व्हावे,असे तुम्हाला वाटते ना मग महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. मी विजयी होणार आहेच,पण किमान ५० हजारांचे मताधिक्य मिळावे, यासाठी प्रयत्न करा. तसेच आरपीआयच्या काहींना मी जातीवाचक बोललो असे पसरविले जात आहे. मुळात तो व्हिडिओ नीट पाहा आणि त्यात मी कुठे आहे, काय बोललोय ते विचारा. मी जातीपातीचे राजकारण कधी करीत नाही, तरी मला बदनाम करण्यासाठी वंचतिच्या पुढाऱ्यांनी ही चाल खेळली आहे. त्याला मात्र काही लोकांनी फार महत्व दिले नाही कारण मला लोक अनेक वर्षे ओळखतात त्यांना माझा स्वभाव माहीत आहे, असेही आ. भास्कर जाधव यांनी सांगितले. वसंत उदेग,बळीराम मोरे यांनीही आपल्या भाषणात सरकारच्या अन्यायाविरोधी धोरणाविषयी जागृत कथा केली.खाडीपट्टा शिवसेना विभाग प्रमुख नितीन निकम,उपविभाग प्रमुख मिलिंद शिर्के,उपविभाग प्रमुख फैयाज शिरळकर,युवा सेना विभाग प्रमुख साहिल शिर्के,शिरळ शाखाप्रमुख हेमंत मोरे,सहकार सेना अध्यक्ष प्रभाकर जाधव,प्रकाश खेडेकर,

सामाजिक कार्यकर्ते सदा वरपे, नंदकुमार चव्हाण, सुनील तांबडे, दयाळ उदेग,नरेश झगडे,नंदकुमार कदम, शशी राऊत, संदीप चिले,नरेश घोले, संदीप कदम,विनोद सुर्वे, युवराज चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, वैभव पवार,रुपेश शेलार,विजय कदम, संदीप जाबरे,गुरुनाथ उदेग,चंद्रकांत खोपडकर  काँग्रेस राष्ट्रवादी उबाठा शिवसेना आरपीआय पक्षाचे पदाधिकारी व आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

फोटो : मालदोली जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्यात बोलताना आमदार भास्कर जाधव छायाचित्र दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Hot this week

माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस १ जून रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार

चिपळूण (ओंकार रेळेकर)माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस...

प्रकाश इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश देशमुख यांचा श्रीलंका देशात कोलंबो येथे वीज ट्रान्समिशन लाईन आणि सबस्टेशनचा करार

कोकणातील उद्योजकाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगात गरुड भरारी चिपळूण (ओंकार रेळेकर)...

अजूनही तेवढाच धडाकेबाज करारीपणा …….म्हणजे बने साहेब : श्रीकृष्ण खातू माजी आमदार डॉ. श्री.सुभाष बने वाढदिवस विशेष

===================शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्तं, धडाकेबाज विचार, बोलण्यात शब्दाला...

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

Topics

चिपळूण नागरीच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनतापार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने...

बांदल स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील पहिली इंग्रजी मध्यमाची शाळा अशी...

अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश बने केरळ मध्ये दाखल

स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे करणार नेतृत्व चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण संगमेश्वर...

वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचा चिपळूण बाजारपेठेत शुभारंभ

प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन; अनेक मान्यवरांची उपस्थिती चिपळूण :...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img