चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक निलेश शंकरराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून स्कॉन प्रो फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो आणि शं. ना. चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व भारत विकास परिषद विकलांग केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर शिबीर दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता तालुक्यातील चिखली येथील ओमकार मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या शुभारंभाला गुहागरचे तहसिलदार परिक्षित पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड उपस्थित राहाणार आहेत. शिबिरापूर्वी नोंदणी अत्यावश्यक असून नोंदणीशिवाय प्रवेश नाही.दिव्यांग बंधू आणि भगिनींना मोफत पिकअप व्यवस्था सकाळी ९ ते ११ या वेळेत गुहागर एस्टी स्टँड व मार्गताम्हाने एस्टी स्टँड येथून उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच शिबिरस्थळीमोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रगत तंत्रज्ञानावर आधारित, जगभरातील प्रशंसित उपकरणे वापरून बनवलेले आणि रु ५० हजार पेक्षा अधिक बाजार मुल्य असणारा कृत्रिम मोड्युलर पाय आणि हात व कॅलिपर येथे पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत. दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी आत्मविश्वास व उभारी देणारे जीवनदायी पाऊल असून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचा नवा किरण दाखवण्यासाठी या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्कॉन उद्योग समूहतर्फे उद्योजक निलेश चव्हाण यांनीकेले आहे. अधिक माहितीसाठी दिलीप ९१६७७४४०४९, संजय
९८१९०३९०८५ शिबिर आयोजक, स्कॉन प्रो फाउंडेशन,
पुणे यांच्याकडे संपर्क साधावा.
