Wednesday, January 22, 2025

३९ व्या वर्षी देखील कर्ला-आंबेशेतची गणेश आगमनाची अखंडित परंपरा

रत्नागिरी:- गणेश आगमनाची भव्य दिव्य मिरवणूक काढून सर्वाचे लक्ष वधून घेणार्‍या कर्ला‚ आंबेशत गावांची गणेश आगमन मिरवणूक दि. ७ सप्टेंबरला वाजत गाजत निघणार आहे. तब्बल ३८ वर्ष सुरु असलेली परंपरा यावर्षीही जपली जाणार असून भव्य मिरवणूकीची जय्यत तयारी ग्रामस्थांनी सुरु केली आहे. शनिवारी चर्तुदर्शीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता स्वातंत्रवीर सावरकर पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणूक सुरु होणार असून ती दुपारी ३ वाजता कर्ला -आंबेशेत गावात पोहचणार आहे.

या मिरवणुकीमध्ये सुमारे १०० ते १२५ लहान‚मोठ्या श्री गणेश बाप्पांचे आगमन होणार आहे. सुरुवातील ढोल‚ताशे, झांझपथक, बागलकोटचे बंडपथक, शिवशक्ती मित्रमंडळ आंबेशेत घोसाळेवाडी यांचे भजन मंडळ, कर्ला येथील गणराज महिला मंडळाचे लेझीम पथक तसेच संगम , नाचणे सुपलवाडी यांचे ढोलपथक अशा दिमाखदार जल्लोषी वातावरणात दिसणार आहे.

या मिरवणुकीचा पाया ३८ वर्षापूर्वी शाहीर के मधुकर (आप्पा) सुर्वे यांच्या शिस्तबद्ध नेतृत्वाखाली रचला गेला. त्यानंतर सुर्वे सरांच्या निधनानंतर मिरवणूक समितीने नूतन अध्यक्ष महेंद्र सुर्वे आणि माजी जि.प. अध्यक्ष जयसिंगराव (आबा) घोसाळे यांच्या नेतृत्वाखाली व कार्यकारी मंडळ समिती उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सदस्य आणि दक्षता समिती सदस्य, सहकारी तरुण कार्यकर्ते, महिला भगिनी वर्ग ग्रामस्थ ही भव्यदिव्य लोकप्रिय व शिस्तबध्द मिरवणूक साकारत आहेत. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मिरवणुकीमध्ये नाविण्य आणले जाते. रत्नागिरीतील नागरिक, बाहेर गावचे चाकरमानी दुतर्फा गर्दी करून आपल्या सहकार्यांना, मुलांना ही मिरवणूक आवर्जुन बघायला आणतात. खास म्हणजे एवढी मोठी मिरवणूक असूनसुध्दा अतिशय निटनेटके, शिस्तबध्द आयोजन या मिरवणूकीत जाणवून येते.
कर्ला ‚आंबेशेत श्री गणेश आगमन (वैयक्तीक) मिरवणुकीचा मार्ग सालाबादप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळयापासून गोखले नाका, राम आळी, एस.टी. स्टँड, जिल्हा रुग्णालय, निवखोल घाटी, आदमपूर, राजीवडा, मारुती मंदिर , श्री साईमंदीर आंबेशेत (चौक) असा आगमन मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. यावेळी येणारी लहान‚मोठी वाहने या मार्गाने सोडू नये, अशी विनंतीही श्री गणेश आमन (वैयक्तीक) मिरवणूकीच्या कार्यकारी मंडळाने केली आहे.

Hot this week

चिपळूणमधील उद्योजक प्रकाश देशमुख मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी...

जगविख्यात इ एन टी सर्जन डॉ. मिनेश जुवेकर यांचे द्वारे अपरांत हॉस्पिटल येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन.

चिपळूण (पवन न्यूज)दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अपरांत हॉस्पिटल येथे...

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

Topics

चिपळूणमधील उद्योजक प्रकाश देशमुख मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान चिपळूण (ओंकार रेळेकर)रत्नागिरी...

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

कोकणात वाळू विक्रीसाठीपरवानगी मिळावी : संदेश मोहिते

चिपळूण : कोकण विभागात वाळूसाठीकायदेशीर परवानगी द्यावी. तसेच निश्चित...

अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी कौतुकास्पद : आ.भास्कर जाधव 

चिपळूण (ओंकार रेळेकर)अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी...

चिपळुणात रांगोळी आणि केक स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : शिवसेनायुवसेनेच्यावतीने (ठाकरे) दि.२३ जानेवारी रोजी रांगोळीस्पर्धा आणि...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img