Wednesday, January 22, 2025

चिपळूणमधील उद्योजक प्रकाश देशमुख मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे अखिल मराठा संमेलनात पुरस्कार प्रदान

चिपळूण (ओंकार रेळेकर)
रत्नागिरी येथे अखिल मराठा फेडरेशन, क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी व मराठा मंडळ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे अखिल मराठा महासंमेलनामध्ये चिपळूण येथील प्रतिथयश उद्योजक प्रकाश देशमुख यांना मराठा बिझनेस एक्सलेंस अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने राजे कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे सरखेल, शिवव्याख्याते नामदेवराव जाधव व अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

चिपळूण येथील नामवंत उद्योजक प्रकाश देशमुख यांनी इलेक्ट्रिकल व हॉटेल उद्योग क्षेत्रात आपले नाव उंचावून शेकडो सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. तर उद्योग क्षेत्र निवडणाऱ्या तरुणांना ते नेहमीच मार्गदर्शन करून सहकार्याचा हात देखील देत असतात. उद्योग क्षेत्रात यश मिळवित असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रकाश देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळताना मराठा समाज बांधवांना संघटित करण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. एकंदरीत सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात देशमुख यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.

याचबरोबर कोरोना असो अथवा महापूर असो या संकट काळात संकटग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटून सामाजिक दायित्व सिद्ध केले आहे. याचीच दखल घेऊन रत्नागिरी येथे अखिल मराठा फेडरेशन क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी मराठा मंडळ रत्नागिरी आयोजित मराठा महासंमेलनामध्ये प्रकाश देशमुख यांना मराठा बिझनेस एक्सलेन्स अवॉर्ड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी अखिल मराठा फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, जी. एम. परब, वीरेंद्र पवार, सरचिटणीस संतोष घाग, सहचिटणीस दीपक चव्हाण, सहचिटणीस सुनील नलावडे, सहचिटणीस मिलिंद बने, खजिनदार महेश चव्हाण, सहखजिनदार दयानंद राणे आदी उपस्थित होते.

तर चिपळूणमधून प्रसाद शिर्के, कपिल शिर्के, प्रभाकर मोरे, सचिन खापणे, तानाजी ईलके, संजय सावंतदेसाई, अजित साळवी, राम कदम, रामदास राणे, संदिप सावंत, सिद्धी मोरे सार्थक मोरे, संजय कदम आदी उपस्थित होते. या सर्वांनी पुरस्काराबद्दल देशमुख यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर चिपळूणवासीयांमधून देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या पुरस्काराबद्दल आपली भावना व्यक्त करतांना ते म्हणाले की, या पुरस्काराने आपल्यावर आणखी जबाबदारी वाढली आहे. सर्वच समाज घटकाला न्याय मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या सर्व सुखदुःखात सहभागी होत सामाजिक दायित्व जपण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही प्रकाश देशमुख यांनी यावेळी दिली आहे. तर तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

Hot this week

जगविख्यात इ एन टी सर्जन डॉ. मिनेश जुवेकर यांचे द्वारे अपरांत हॉस्पिटल येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन.

चिपळूण (पवन न्यूज)दिनांक 25 फेब्रुवारी रोजी अपरांत हॉस्पिटल येथे...

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

कोकणात वाळू विक्रीसाठीपरवानगी मिळावी : संदेश मोहिते

चिपळूण : कोकण विभागात वाळूसाठीकायदेशीर परवानगी द्यावी. तसेच निश्चित...

Topics

रोटरॅक्ट फन-एन-फेअर मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ

सलग २७ वर्ष दिमाखात सुरू आहे रोटरॅक्ट फन-एन-फेअरचे आयोजन चिपळूण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिपळूणात विविध कार्यक्रमाचे आयोजन

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३...

रेयांश बने याची रोलर स्केटिंग मध्ये उंच भरारी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर निवड

सलग दुसऱ्या वर्षीही स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरी चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण...

कोकणात वाळू विक्रीसाठीपरवानगी मिळावी : संदेश मोहिते

चिपळूण : कोकण विभागात वाळूसाठीकायदेशीर परवानगी द्यावी. तसेच निश्चित...

अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी कौतुकास्पद : आ.भास्कर जाधव 

चिपळूण (ओंकार रेळेकर)अविनाश कांबळे यांची कलर निर्मिती उद्योगातील कामगिरी...

चिपळुणात रांगोळी आणि केक स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : शिवसेनायुवसेनेच्यावतीने (ठाकरे) दि.२३ जानेवारी रोजी रांगोळीस्पर्धा आणि...

यु.एस.व्हि.प्रा.लिमिटेड मध्ये विलास चाळके यांची युनियन अध्यक्षपदी निवड

चिपळूण (ओंकार रेळेकर) यु.एस.व्हि.प्रा.लिमिटेड मध्ये विलास चाळके यांची युनियन...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img