Saturday, April 19, 2025

चिपळूण नागरीच्या कर्मचाऱ्यांच्या शाखातंर्गत ३० एप्रिल व १ मे रोजी क्रिकेट स्पर्धा

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा अंतर्गत क्रिकेट स्पर्धा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील होणार असून ही स्पर्धा ३० एप्रिल व १ मे रोजी चिपळूण नगर परिषदेच्या पवन तलाव मैदानावर प्रकाशझोतात होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे. या संस्थेच्या रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ५० शाखा कार्यरत आहेत. या ५० शाखांमध्ये जवळपास २५८ हुन अधिक कर्मचारी व ६५ हुन अधिक अल्पबचत प्रतिनिधी, ४९ सराफ व १ हजार १०७ हून अधिक समन्वयक कार्यरत असून अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करणारा वर्ग म्हणून या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा नाव लौकिक आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये सर्वोत्कृष्ठ काम करणारे शाखाधिकारी, सर्वोत्कृष्ट काम करणारे वसुली कर्मचारी यांचा खास यथोचित सत्कार केला जातो. सर्व कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाबाबत वर्षात एकुण चार पगार भेट म्हणून दिली जाते. अशा पद्धतीने त्यांचे कौतुक करीत असतानाच अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमासह तर कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर गेली २०१७ पासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
यानुसार दरवर्षीप्रमाणे दि. ३० एप्रिल व १ मे २०२५ रोजी या कालावधीत संस्थेच्या सात विभागाच्या शाखांतर्गत कर्मचाऱ्यांच्या आठ संघामध्ये ही स्पर्धा होणार आहे. तसेच कर्मचारी संघ विरुद्ध संचालक मंडळ संघ अशा लक्षवेधी सामन्याचे दि. १ मे रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा क्रिकेट क्षेत्रातील क्रिडापटुना व क्रिकेटची आवड असणाऱ्या क्रिडा रसिकांना एक प्रकारचे आकर्षण असेल. या स्पर्धा चिपळूण नगरपालिकेच्या पवन तलावावरील स्टेडीअमवर ३० एप्रिल व १ मे रोजी दोन दिवस ही स्पर्धा प्रकाशझोतात होणार असून रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहेत. विजेत्या संघ‌ाला व उपविजेता संघाला आकर्षिक शिल्ड देण्यात येणार आहे. संस्थेच्या नाविन्यपुर्ण उपक्रमास क्रिडा रसिकांनी व संस्थेच्या चाहत्यांनी उपस्थित राहुन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन चिपळूण नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे.

Hot this week

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल जाधव

चिपळूण : माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती श्री.बाळशेठ...

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे २ विदयार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत

चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

Topics

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल जाधव

चिपळूण : माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती श्री.बाळशेठ...

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img