चिपळूण : महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे कोकण विभाग प्रमुख सैफ सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांची मंगळवारी सदिच्छा भेट घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असलेल्या महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे कार्य सांगून महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली.

या भेटीत महाराष्ट्र पोलिस व त्यांच्या कल्याणासंबंधी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र पोलिसांच्या हितासाठी अधिक प्रभावी काम कसे करता येईल यावर विशेष भर देण्यात आला.या भेटीप्रसंगी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना कोकण विभाग प्रमुख श्री. सैफ सुर्वे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. आतिफ गोठे, निवृत्त पोलिस अधिकारी व जस्टिस नेव्हिगेटर्स चे संचालक श्री. राजेंद्र देसाई सर, तसेच संघटनेचे सल्लागार श्री. राम पाळवदे हे उपस्थित होते.श्री. राजेंद्र देसाई सर जस्टिस नेव्हिगेटर्स चे संचालक. आतिफ गोठे व श्री. सैफ सुर्वे हे दोघेही जस्टिस नेव्हिगेटर्स या संस्थेचे संस्थापक आहेत, जी संस्था सामाजिक न्याय व कायदेशीर सहाय्यासाठी कार्यरत आहे.या भेटीमधून निश्चितच पुढील काळात महाराष्ट्र पोलिसांसाठी अनेक सकारात्मक उपक्रम व योजना राबविण्याचा निर्धार करण्यात मदत होईल असं सैफ सुर्वे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.
फोटो : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांचा सत्कार करताना सैफ सुर्वे, अतिफ गोठे,राजेंद्र देसाई आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)