Saturday, April 19, 2025

आ.शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध निकम ऑस्ट्रेलिया देशात मास्टर्स ऑफ ऍग्रीकल्चर पदवीने सन्मानित

चिपळूण:-चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आ.शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध निकम यांनी  ऑस्ट्रेलिया देशात मागील दोन वर्ष शिक्षण घेऊन येथील ब्रिसबेन राज्यात  युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड या शिक्षण संस्थेत मास्टर्स ऑफ ऍग्रीकल्चर पदवी नुकतीच प्राप्त केली आहे.

 गुरुवार दि.५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ऑस्ट्रेलिया मधील क्वीन्सलँड राज्यात  युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड या शिक्षण संस्थेत मास्टर्स ऑफ ऍग्रीकल्चर पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न झाला या पदवी प्रधान कार्यक्रमाला अनिरुद्ध निकम यांचे वडील चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, मातोश्री चिपळूणच्या माजी सभापती पूजा निकम, बहीण सई अभिजीत सुर्वे, मुक्ता शेखर निकम आदी कुटुंबीय खास आवर्जून उपस्थित होते.


 अनिरुद्ध यांनी नुकतेच (ऑगस्ट २०२४) आपले पदव्युतर शिक्षण -“Masters in Agricultural  Science in The Field of Horticulture ”हे युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड, ब्रिसबेन,ऑस्ट्रेलिया येथून पूर्ण केले.हा पदवी प्रदान सोहळा ब्रिसबेन, ऑस्ट्रेलिया येथे संपन्न झाला अनिरुद्ध यांनी ब्रिस्बेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड येथे जूलै २०२२ पासुन ऑस्ट्रेलियन एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि हॉर्ट इनोवेशन यांच्या सोबत “Avocado Fruit Robustness and Value Chain-Initiative by QDAF, Australian Avocados, Hort Innovation ” या प्रोजेक्ट वर काम केले, त्याचे हे काम “AV21005” या प्रोजेक्ट ख़ाली पूढ़ील वर्षी ऑस्ट्रेलिया गवर्नमेंट च्या पुस्तिकेमध्ये प्रकाशित होणार आहे.या दोन वर्षाच्या शैक्षणिक कालावधी बरोबर त्यांनी अनेक लीडरशिप उपक्रम, त्याचबरोबर संशोधन कॉनफ़ेरेंस, इतर शैक्षणिक आणि संशोधन कार्यांची एकूणच कार्यक्षमता याच्या अनुभवावर  यूनिवर्सिटी ऑफ़ क्वींसलैंडच्या अकादमिक आणि वीसी कमिटी ने त्यांना या वर्षीचा “Dean’s Commendation Award for Academic Excellence-2024  हा सन्मान जाहीर केला व तो गुरुवारी देण्यात आला. यावेळी आमदार शेखर निकम, सौ.पुजाताई निकम,ज्येष्ठ कन्या सौ. सई अभिजीत सुर्वे,मुक्ता शेखर निकम आदी कुटुंबीय उपस्थित होते.आमदार शेखर निकम हे स्वतः कृषि पदविधर (Master in Plant Pathology) असल्याने अनिरुद्ध यांच्या या सर्व वाटचालीस त्यांचे मोलाचे योगदान आहे.आज ब्रिसबेन,ऑस्ट्रेलिया येथे पदवी प्रदान सोहळ्यामध्ये अनिरुद्ध यांना पदवी प्रदान करण्यात आली. कृषी व औद्योगिक क्षेत्रात पुढे काम करणार असल्याचे अनिरुद्ध याने यावेळी सांगितले. आ. शेखर निकम व कुटुंबियांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

Hot this week

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल जाधव

चिपळूण : माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती श्री.बाळशेठ...

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत ए.सी.बी. इंटरनॅशनल स्कूलचे २ विदयार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत

चिपळूण : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

Topics

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल जाधव

चिपळूण : माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती श्री.बाळशेठ...

कोकणच्या इतिहासात रेयांश बने याने रचला नवा विक्रम

केरळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग स्पर्धेत...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (पवन न्युज) कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे दिला जाणारा...

चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट बॉम्बे सर्कसचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणवासीयांच्या मनोरंजनासाठी चिपळूण मध्ये दाखल झालेल्या ग्रेट...

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img