चिपळूण:-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते तथा विधिमंडळातील शिवसेना गटनेते आ.भास्करराव जाधव गुहागर विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे आभार व्यक्त करण्याकरीता व गाठीभेटी घेण्यासाठी शुक्रवारपासून मतदार संघात दाखल होत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा
विजयी झाल्या बद्दल शिवसेना नेते आ.भास्करराव जाधव हे मतदारसंघातील जनतेचे आभार व गाठीभेटी घेण्यासाठी शुक्रवारपासून चिपळूण गुहागर विधानसभा मतदारसंघात उपस्थित राहणार आहेत. दि. २९ नोव्हेंबर पासून चिपळूण येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे शुक्रवारी स.११ ते दू.१ या वेळेत नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत.गुहागर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या खेड तालुक्यातील गावांमधील ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेण्यासाठी व आभार मानण्यासाठी उबाठा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन उर्फ पप्पू आंब्रे यांच्या आवाशी ता.खेड येथील निवासस्थानी दु.३ ते साय.५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत.
तसेच शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी गुहागर तालुक्यातील नागरिकांचे आभार मानण्यासाठी व गाठीभट्टी घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह गुहागर येथे स. ११ ते दु. १ यावेळेत उपस्थित राहणार आहेत.शनिवारी सकाळी गुहागर शहरात आगमत होतातच आ.जाधव प्रथम गुहागर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्रामगृह गुहागर येथे जाणार आहेत.उबाठा शिवसेना,शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी,इंदिरा काँग्रेस आणि महाविकास आघाडी मधील कार्यकर्ते आ.जाधव यांच्या आभार आणि गाठीभेटी दौऱ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.