चिपळूण (ओंकार रेळेकर)मुलांवर चांगले संस्कार घडविण्याचे महान कार्य या शाळेत होते इक्रा शाळेतून शिक्षण घेणारी मुले भविष्यात देशात उच्च पातळीवर काम करणारी मुले घडतील असा विश्वास व्यक्त करून मौलाना इल्यास बगदादी यांच्या मार्गदर्शनाखाली सूरु असलेली इक्रा स्कूल अल्पावधीतच रत्नागिरी सारख्या मोठ्या शहरात प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.शाळेने शिक्षणाचा दर्जा खूप उच्च ठेवला आहे अशा शब्दात मर्चंट नेव्ही अधिकारी इम्रान कोंडकरी यांनी इक्रा शाळेचे कौतुक केले.
रत्नागिरी शहरातील लोकप्रिय इक्रा इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूणचे सुपुत्र मर्चंट नेव्ही अधिकारी इमरान कोंडकरी उपस्थित होते. शाळेतील लहान मुलांनी विविध गाण्यांवर नृत्य करून आपल्यातील कला गुण सादर केले देशभक्तीपर गीते यावरही सादरीकरण करत मुलांनी आपल्यातील अभिनय सादर केला. यावेळी आपल्या मनोगतात इम्रान कोंडकरी यांनी मुलांना चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन केले आणि महत्त्वाच्या टिप्स दिल्या.
अंजुमन दर्दमंद चे अध्यक्ष हजरत मौलाना मुफ्ती रफिक पुरकर,मर्चंट नेव्ही चिफ इंजिनीअर इम्रान कोंडकरी,हजरत मौलाना मुफ्ती तौफिक सारंग आदी मान्यवर मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित होते. यावेळी इमरान कोण करी यांचा इक्रा स्कूलच्या वतीने अंजुमन दर्दमंद चे अध्यक्ष हजरत मौलाना मुफ्ती रफिक पुरकर,हजरत मौलाना मुफ्ती तौफिक सारंग यांनी सन्मान चिन्ह देऊन भव्य सत्कार केला. अल्पसंख्यांक चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी,सामाजिक कार्यकर्ते बरकत पाते,झहिर कुंडलिक,इम्रान खतिब उपस्थित होते.
फोटो : मर्चंट नेव्ही अधिकारी इम्रान कोंडकरी यांचा सत्कार करताना अंजुमन दर्दमंद चे अध्यक्ष हजरत मौलाना, मुफ्ती रफिक पुरकर,हजरत मौलाना मुफ्ती तौफिक सारंग आणि मान्यवर छायाचित्र दिसत आहेत (छाया: ओंकार रेळेकर)