मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात रक्तदानाचे काय महत्त्व आहे या विषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून मनसे नेते प्रमोद गांधी यांनी गुहागर मध्ये एक आगळी वेगळी संकल्पना राबविली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी श्रृंगारतळी येथे आयोजित विविध सामाजिक उपक्रमात रक्तदान शिबिरात क्रिकेट मंडळाने आपले कार्यकर्ते आणून रक्तदान करावे पुढे त्यांना आणि त्यांच्या संघाकडून मनसेच्या क्रिकेट स्पर्धेतील वीस हजार रुपये प्रवेश फी माफ करण्यात आली होती या आवाहनाला साथ देत असंख्य क्रिकेट टीम ने सहभाग नोंदवत रक्तदान केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र आयोजित मनसेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एक समाज असंख्य रक्तदाते’या मथळ्याखाली गुहागर तालुका मनसेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर
शृंगारतळी पालपेणे रोड, भवानी सभागृह येथे रविवारी संपन्न झाले. या
शिबिरात सुमारे २०० रुग्णांनी नेत्र तपासणी केली व ७० दात्यांनी
रक्तदानाचे पवित्र कार्य पार पाडले.
या शिबिराला गुहागरचे तहसिलदार परिक्षित पाटील, तालुका आरोग्य अधिकारी
डाँ. घनश्याम जांगीड, डाँ. राजेंद्र पवार, सुरेश सावंत यांनी भेट दिली.
मनसेचे गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी सुमारे ७० दात्यांनी रक्तदान केले. त्यांना रक्तदाते म्हणून
सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच मोफत नेत्र तपासणीलाही
उर्स्फूत प्रतिसाद लाभला. सुमारे २०० रुग्णांनी नेत्र तपासणी करुन घेतली.
यावेळी त्यांना नंबरनुसार मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल अनेक आरोग्य सेवकांचा आरोग्य दूत
म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मनसेचे उपजिल्हाप्रमुख विनोद
जानवळकर, मनसे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्यासह मनसेचे
पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
फोटो : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनी आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला सन्मानपत्र देताना मनसेचे नेते प्रमोद गांधी आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)