चिपळूण उबाठा शिवसेना आक्रमक

चिपळूण (ओंकार रेळेकर)छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी असे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री. आकाश लिंगाडे साहेब यांना देण्यात आले आला त्यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहर प्रमुख शशिकांत मोदी ,शहर सचिव प्रशांत मुळये, उपशहर प्रमुख संजय रेडीज भैया कदम, संतोष पवार ,विकी नरळकर ,युवा सेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे विभाग प्रमुख संजय गोताड, उपविभाग प्रमुख महेश संसारे व महिला आघाडी पदाधिकारी सौ. अर्चना कारेकर आदी उपस्थित होते त्यांच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास शिवसेना ती॔व आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
फोटो : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना शिवसेना क्षेत्र प्रमुख बाळा कदम शिवसेना शहरप्रमुख शशिकांत मोदी,शिवसेना पदाधिकारी आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)