Sunday, June 29, 2025

रेयांश पराग बने याची बाल वयातच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी

९ वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कु. रेयांशने महाराष्ट्राची मान उंचावली

चिपळूण (ओंकार रेळेकर)कलकत्ता येथे झालेल्या ९ व्या अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघातून नेतृत्व करताना
देवरुख चा सुपुत्र माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू रेयांश पराग बने याने विविध स्केटिंग प्रकारात एकूण तीन सुवर्णपदके मिळवून सुवर्णपदकाची हॅट्रिक करीत महाराष्ट्राची भारताची मान उंचावली आहे.
९ वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धा २०२५ कलकत्ता रवींद्र सरोवर लेक येथे गुरुवार दिनांक १९ जून ते २३ जून दरम्यान आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा road lap, १०० m road , ५०० m road अशी तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती. कु. रेयांश पृथा पराग बने हा नऊ वर्षाचा असून याने या स्पर्धेत (8 -10) वयोगटातून महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून रेयांश बने याची निवड झाली होती.
रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (RSFI) यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा कलकत्ता रवींद्र सरोवर लेक येथे पार पडली. या अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कु. रेयांश पृथा पराग बने याने (road १ lap) स्पर्धेत १ सुवर्णपदक , (१००mtr road) स्पर्धेत 1 सुवर्णपदक तसेच (५००mtr road) स्पर्धेत १ सुवर्णपदक अशी एकूण तीन सुवर्णपदके मिळवून सुवर्णपदकाची हॅट्रिक करून महाराष्ट्राची तसेच भारताची मान उंचावली आहे.
कु. रेयांश ने आतापर्यंत गोवा, म्हैसूर, केरळ आणि कलकत्ता येथे चार वेळा महाराष्ट्राचे रोलर स्केटिंग साठी नेतृत्व केले आहे.
कु. रेयांश हा मुंबईतील भांडुप या उपनगरात राहत असून महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाळकृष्ण बने शेठजी तसेच सचिव माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू आहे. कु.रेयांश बने हा युरो स्कूल, ऐरोली, ठाणे या शाळेचा विद्यार्थी असून वयाच्या पाचव्या वर्षी त्याने महाराष्ट्रातील बेळगाव येथे सतत ९६ तास स्केटिंग करून आपले नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. त्याने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये 33 सुवर्ण 12 रौप्य आणि 8 कांस्य पदके पटकावली आहेत. कू. रेयांश पृथा पराग बने हा शिवसेना भांडूपचे युवानेते पराग बने आणि पराग इंग्लिश स्कूल भांडुप या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पृथा पराग बने यांचा चिरंजीव आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक, सर्व भांडुपकर याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध थरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भांडुप येथील रेयांश चे नातेवाईक, मित्रपरिवार आणि त्यांच्या चहात्यांनी पेढे वाटून रेयांश च्या यशाचा आनंद साजरा केला. कु. रेयांश सोमवार दिनांक 23 जून रोजी पहाटे 2.00 च्या विमानाने कलकत्त्यावरून मुंबईसाठी रवाना होणार आहे तो सकाळी सहा वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर पोहोचेल. त्याचे नातेवाईक व चाहते मुंबई विमानतळावर रेयांशचे स्वागत करण्यासाठी जमणार आहेत.बने कुटुंबासाठी सुवर्णक्षण रेयांश याने मिळवलेले हे यश अद्वितीय असून बने कुटुंबियांसाठी हा सुवर्णक्षण आहे. शालेय अभ्यास करतानाच त्याने
स्केटिंग क्षेत्रात घेतलेले परिश्रम व दाखवलेली चिकाटी अप्रतिम
आहे. तसेच त्याच्या आईवडिलांनी सातत्याने त्याला
दिलेला पाठिंबा, प्रोत्साहन आणि प्रक्षिकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे उत्तुंग यश मिळाले असून
आमचे आशीर्वाद नेहमीच रेयांशच्या पाठी असतील अशी
भावनिक प्रतिक्रिया माजी आमदार डॉ.सुभाष बने यांनी यावेळी दिली आहे.

Hot this week

मराठा महाकुटुंब समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी : प्रकाश देशमुख

चिपळूण तालुका मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न चिपळूण...

सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान तर्फे शुक्रवारी शेतकऱ्यांना मोफत खत वाटप

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.डॉ.उदय सामंत आ.किरण सामंत,आ. शेखर निकम...

डॉ. यतीन जाधव ‘लोटिस्मा’ अध्यक्षपदी; कार्याध्यक्षपदी अरुण इंगवले यांची निवड

१६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची नवीन कार्यकारिणी...

🛑आमदार किरण सामंत यांची वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट

◾प्रशांत यादव आणि सौ. स्वप्ना यादव यांच्याकडून स्वागत चिपळूण (ओंकार...

प्रथमेश जीवन रेळेकर याचे एल. एल.बी परीक्षेत सुयश

चिपळूण (ओंकार रेळेकर) येथील पेठमाप प्रभागातीलप्रथितयश अँड.श्री. जीवन काशिनाथ...

Topics

मराठा महाकुटुंब समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी : प्रकाश देशमुख

चिपळूण तालुका मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न चिपळूण...

सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठान तर्फे शुक्रवारी शेतकऱ्यांना मोफत खत वाटप

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.डॉ.उदय सामंत आ.किरण सामंत,आ. शेखर निकम...

डॉ. यतीन जाधव ‘लोटिस्मा’ अध्यक्षपदी; कार्याध्यक्षपदी अरुण इंगवले यांची निवड

१६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची नवीन कार्यकारिणी...

🛑आमदार किरण सामंत यांची वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट

◾प्रशांत यादव आणि सौ. स्वप्ना यादव यांच्याकडून स्वागत चिपळूण (ओंकार...

प्रथमेश जीवन रेळेकर याचे एल. एल.बी परीक्षेत सुयश

चिपळूण (ओंकार रेळेकर) येथील पेठमाप प्रभागातीलप्रथितयश अँड.श्री. जीवन काशिनाथ...

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज- सुभाषराव चव्हाण

चिपळूण नागरी व वाशिष्ठी डेअरी, जिल्हा निबंधक सहकारी संस्थेतर्फे...

महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

चिपळूण :  महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे...

चिपळूण नागरीने सलग ३२ वर्ष सभासदांचा विश्वास टिकवून ठेवला

संकल्प-संकल्पपूर्ती सोहळा करणारी एकमेव पतसंस्था … तर सहकारात आणखी चांगले...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img