Tuesday, March 11, 2025

शिवसेना नेते आ. भास्करराव जाधव यांची मागणी ना.सरनाईक यांच्याकडून तात्काळ मान्य

गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस

चिपळूण (ओंकार रेळेकर)गुहागर आगारात असणाऱ्या बसेस या खुप जुन्या असून गेली १०-१२ वर्ष या आगारासाठी नवीन बसेस पुरविण्यात आलेल्या नाहीत. आता आगारात असणाऱ्या बसेस या खुप जुन्या झाल्या असून त्या वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अनेक बसेस गळक्या असून पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तात्पुरती डागडुजी करून प्रवाशांची गरज भागवली जाते. हे लक्षात घेऊन गुहागर आगाराला १५ नव्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी शिवसेना नेते, मतदारसंघाचे आमदार श्री भास्करराव जाधव यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री ना. श्री. प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यासंबंधीचे पत्र आमदार श्री. जाधव यांनी देताच ना. श्री. सरनाईक यांनी ही मागणी मान्य करून तत्काळ संबंधितांना निर्देश दिले.
मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आज आ. श्री. जाधव यांनी ना. सरनाईक यांची भेट घेतली.त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या आणि जुन्या झालेल्या वातानुकूलित शिवशाही बस बंद करून शिवाई, शिवनेरी यासारख्या नव्या गाड्या द्याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली. तीदेखील ना. सरनाईक यांनी मान्य केली.

Hot this week

क्रिकेट स्पर्धेतून केली रक्तदान विषय जनजागृती मनसे नेते प्रमोद गांधी यांची अनोखी संकल्पना

मनसेच्या रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद चिपळूण (ओंकार रेळेकर) मानवी जीवनात...

स्कॉन उद्योग समूहतर्फे चिखली येथे ९ मार्चला दिव्यांगांसाठी मोफत शिबीर

चिपळूण (ओंकार रेळेकर) कोकण भूमिपुत्र व स्काँन उद्योग समूहाचे...

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत चिपळूण शहरात महास्वच्छता अभियान

चिपळूण (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या...

क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी कौतुकास्पद : खा.सुनील तटकरे

चिपळूण (ओंकार रेळेकर)क्रीडा क्षेत्रात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनची कामगिरी...

महाराष्ट्रात सहकारातून समृद्धी घडविण्याचे काम पतसंस्थांनी केले : अनिल कवडे

◾कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिपळूण नागरी पतसंस्था कोकण...

Topics

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य

चिपळूण उबाठा शिवसेना आक्रमक  चिपळूण (ओंकार रेळेकर)छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक...

फन एन फेअरच्या माध्यमातून रोट्रॅक्टने विक्रेत्यांना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले : प्रशांत यादव

चिपळूण (ओंकार रेळेकर)रोट्रॅक्ट फन एन फेअर मधून असंख्य विक्रेत्यांना...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img